WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तालुक्यातील सात व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याने रुग्णसंख्या 121 झाली

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहर व तालुक्यात कोरोनाचा कहर वाढतच असून कोरोना उग्र रुप धारण करतांना दिसत आहे. शहर व तालुक्यात दर दिवशी कोरोनाचे रुग्ण आढळत असून रुग्णांचा आलेख सतत वाढत आहे. आज आणखी 7 पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 121 झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 60 झाली आहे. आज 20 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून 3 पॉझिटीव्ह तर 17 नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. तसेच आज 33 रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आल्या, त्यामधे 4 व्यक्ती पॉझिटीव्ह आढळून आल्या तर 29 व्यक्तींचे रेपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आता पर्यंत एकुण 1109 रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आल्या आहे तर 1358 आरटी पिसिआर तपासणी करण्यात आली आहे. आज पर्यंत एकुण 3486 आरटी पिसिआर व रॅपिड अँटीजन तपासण्या करण्यात आल्या आहे.

शहरा बरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण वाढत असून कोरोनाची परिस्थिती भयावह रुप धारण करतांना दिसत आहे. सातत्याने कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने प्रशासनही चिंताग्रस्त झाले आहे. वेगवेगळ्या परिसरातील व्यक्ती पॉझिटीव्ह निघत असल्याने प्रत्येक परिसरात उपाययोजना करतांना आरोग्य विभगाची चांगलीच दमछाक होतांना दिसत आहे. शहरात दिवसागनिक रुग्ण आढळत असल्याने प्रशासनाची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. आज आणखी 7 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह असल्याने तालुक्यातील पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढून 121 झाली आहे. त्यापैकी 59 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे तर दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 60 झाली आहे. यामध्ये 5 पुरुष व 2 महिलांचा समावेश असून तुट्या कमाणी जवळील औषधी विक्रेता व लालगुडा येथील ताटेवार ले-आउट मधिल उकनी कोळसा खदानीत कार्यरत असणारा व्यक्ति पॉझिटीव्ह असल्याचे समजते. गुरुनगर येथील कोळसा खदानीत कार्यरत असलेला व्यक्ति 23 ऑगस्टला कोरोना बाधित निघाला होता तर आज आणखी एक खदानीतील व्यक्ती पॉझिटीव्ह निघाल्याने कोळसा खदानीतील कर्मचारी वर्ग धास्तावला आहे. तसेच लगातार पॉझिटीव्ह रुग्ण आढळत असल्याने शहरात भितिचे वातावरण पसरले आहे. प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असून नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share