WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तालुक्यातील दहा व्यक्तींच्या नमुन्यांचे अहवाल पॉझिटीव्ह, रुग्ण संख्या झाली 131

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहर व तालुक्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढतच असून आज तालुक्यात 10 पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने तालुक्यातील पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 131 झाली आहे. तर ऐक्टिव पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 70 झाली आहे.

शहर व तालुक्यात कोरोनाचा कहर वाढतच असून दिवसागनिक पॉझिटीव्ह रुग्ण आढळत आहे. कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता, कोरोनचे संक्रमण रोखतांना प्रशासनही हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागाचिही कोरोना बाधित क्षेत्रातील नागरिकांची काळजी वाहतांना चांगलीच दमछाक होतांना दिसत आहे. आज शहरातील दोन डॉक्टारांबरोबरच आठ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज तीन नमुन्यांचे अहवाल पॉझिटीव्ह आले तर अँटी रापिड़ चाचणी अंतर्गत पाच रेपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत, तसेच शहर्तील दोन व्यक्तींचे रेपोर्ट चंद्रपुर येथे पॉझिटीव्ह आले आहेत. आज पॉझिटीव्ह आलेल्या व्यतींमधे भालर येथील एक, सर्ववोदय चौक येथील तीन, तलाव रोड वरिल एक, वरध अपार्टमेन्ट च्या बाजूचे दोन व गौरक्षंंन मधिल तीन व्यक्तींचा समावेश आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव औषधी विक्रेत्यासह डॉक्टारांनाही होतांना दिसत आहे. आज पॉझिटीव्ह आलेल्या व्यक्तींमुळे तालुक्यातील पॉझिटीव्ह व्यक्तींची संख्या 131झाली असून ऐक्टिव पॉझिटीव्ह व्यक्तींची संख्या 70 झाली आहे. प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असून नागरिकांनाही दक्षता घेण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.