WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

रुग्णसंख्येचा आलेख वाढतच असून आज चार व्यक्तिंचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत !

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहर व तालुक्यात सातत्याने कोरोना बाधित रुग्ण आढळत असून रुग्ण वाढीचा आलेख वाढतच चालला आहे. कोरोना संक्रमणाचा वेग वाढला असून सामूहिक संसर्गाला सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. दिवसागणिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याने तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा फुगतच चालला आहे. आज चार व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३२३ झाली. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७६ झाली आहे. आज आणखी १५ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत २३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

शहर व तालुक्यात कोरोनाचे संक्रमण चांगलेच वाढले असून दरदिवशी कोरोना संक्रमित व्यक्तींची नोंद होत असल्याने प्रशासनावरील तान चांगलाच वाढतांना दिसत आहे. आरोग्य प्रशासनाचीही चांगलीच दमछाक होतांना दिसत आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारेच आता कोरोना संक्रमित होऊ लागल्याने त्यांच्यातही कोरोनाची धास्ती निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोविद योद्धयांनाच कोरोनाची लागण होऊ लागल्याने परिस्थिती गंभीर होतांना दिसत आहे. ११ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या २९ दिवसांच्या कालावधीत तब्बल २८२ कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडली आहे. १० ऑगस्ट पर्यंत तालुक्यात ४१ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद होती. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह एकच रुग्ण राहिला होता. तालुका कोरोनमुक्त होण्याच्या वाटेवर असतांना अचानक कोरोनाने उसंडी मारत रुग्णांचे त्रिशतक पूर्ण केले आहे. आज २४ रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या, त्यापैकी ४ व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तर २० व्यक्ती निगेटिव्ह आल्या. आता पर्यंत एकूण १४४३ रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या तर १९२७ व्यक्तींच्या स्वाबची तपासणी करण्यात आली. आज आणखी २७ नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने २४४ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित झाले आहेत. आज आणखी १५ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी २९ रुग्ण कोविड केयर सेंटरला भरती असून ३३ व्यक्तींना होम आयसोलेशन करण्यात आले आहे. तर १४ व्यक्तींवर यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. सध्या स्थितीत ७५ व्यक्तींना संस्थात्मक विलीगीकरणात ठेवण्यात आले आहे. आज ४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३२३ झाली असून २३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर ४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७६ झाली आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये पोलीस क्वाटर येथील एक, शास्त्रीनगर एक, वासेकर ले-आऊट एक तर रंगारीपुरा येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. आज आणखी एक पोलीस जमादार पॉझिटिव्ह आल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रशासन कोरोनावर नियंत्रण मिळविण्याकरिता शर्थीचे प्रयत्न करीत असून नागरिकांनीही सावधानी बाळगण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share