WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कोरोनाचे संक्रमण वाढतच असून आज ११ व्यक्तींना झाली कोरोनाची लागण !

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहर व तालुक्यातील कोरोनाचं संकट गंभीर होतांना दिसत असून कोरोनाची परिस्थिती आणखीच बिकट होतांना दिसत आहे. कोरोना संक्रमणाची गती अधिकच तीव्र झाली असून कोरोना रुग्णांचा वाढता आलेख प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. आरोग्य प्रशासनावरही चांगलाच तान निर्माण झाला असून आरोग्य सेवक व आशा सेविकांची चांगलीच पायपीट होतांना दिसत आहे. दिवसागणिक रुग्ण आढळत असल्याने रुग्णांचा आकडाही चांगलाच फुगत चालला आहे. आज आणखी ११ कोरोना बाधित रुग्णांची भर पडल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४८४ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५३ झाली आहे. आज आणखी २६ रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ३२१ झाली आहे. सुरक्षा रक्षक, आरोग्य रक्षक, कायदेविषयक सल्लागार, न्यायालयीन कर्मचारी, गृहरक्षक. प्रशासकीय कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात आले असतांनाच आता वृत्त सेवेतील व्यक्तीलाही कोरोनाची लागण झाल्याने प्रत्रकारिता क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने जनजीवन प्रभावित झाले आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविताना शहर प्रशासन व आरोग्य प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न कमी पडतांना दिसत आहे. कोरोना रुग्णांचा आलेख वाढतच चालला आहे. आज ३६ तपासणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून ७ पॉझिटिव्ह तर २९ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज २० व्यक्तींची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. त्यापैकी ४ व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह तर १६ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज आणखी ३४ व्यक्तींचे स्वाब आरटी पीसीआर तपासणी करिता पाठविण्यात आल्याने १२० रिपोर्ट पेंडिंग झाले आहेत. आज ११ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४८४ झाली असून ३२१ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर १० रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५३ झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ४४ रुग्ण कोविड केयर सेंटला भरती असून ९३ रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु आहेत. तर १६ रुग्णांना यवतमाळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सध्यास्थितीत ६० व्यक्तींना संस्थात्मक विलीगीकरणात ठेवण्यात आले आहे. कोरोनाचे संक्रमण वाढतच चालले असून महत्वपूर्ण क्षेत्रातील व्यक्तींबरोबरच पत्रकारिता क्षेत्रातील व्यक्तींनाही कोरोनाची लागण होतांना दिसत आहे.

आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये सिंधी कॉलनी येथील एक, जिजाऊ नगर ३, जैन ले-आऊट २, वाघदरा २, सेवानगर १, पेटूर येथील एक तर बांधकाम विभागाच्या क्वाटर मधील एका व्यक्तीचा समावेश आहे. प्रशासन कोरोनाचे संक्रमण रोखण्याकरिता सर्वोतपरी प्रयत्न करीत असून नागरिकांनीही कोरोनाचे संक्रमण वाढणार नाही याची दक्षता घेण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share