कोरोनाची एका दिवसातील रुग्णसंख्या मंदावली, आज आले ९ कोरोना अहवाल पॉझिटिव्ह !
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहर व तालुक्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढतच असून संक्रमणाची गती मागील दोन तीन दिवसांपासून धीमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. दिवसाला मोठ्या संख्येने आढळणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण आता कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. एका दिवसातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नियंत्रणात आली असल्याचे मागील दोन तीन दिवसांच्या आकडेवारीवरून लक्षात येत आहे. आज ९ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४९३ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १४६ झाली आहे. आज आणखी १५ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ३३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील एकता नगर परिसरातील ६० वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाल्याने तालुक्यातील कोरोना बळींचा आकडा ११ वर पोहचला आहे. तालुक्यातील कोरोना बळींची संख्या वाढतांना दिसत आहे.
शहरात कोरोनाचे रुग्ण वाढतच असून ग्रामीण भागातील रुग्णही वाढीस लागले आहे. मागील दोन तीन दिवसांपासून एका दिवसातील कोरोनाची रुग्ण संख्या नियंत्रित झाल्याचे पाहायला मिलत असून दिवसाला मोठ्या संख्येने आढळणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे. आज ४३ तपासणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून ७ पॉझिटिव्ह तर ३६ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज १६ व्यक्तींच्या रॅपिड अँटीजेन चाचणीचे रिपोर्ट प्राप्त झाले असून २ पॉझिटिव्ह तर १४ रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आजच्या दिवसा पर्यंत १५७३ रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या असून २१४० व्यक्तींच्या स्वाबची आरटी पीसीआर तपासणी करण्यात आली आहे. आज आणखी ४७ व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने १२४ नमुन्यांचे अहवाल पेंडिंग झाले आहेत. शहरातील एकता नगर परिसरातील एका ६० वर्षीय कोरोना बाधित महिलेचा यवतमाळ येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने तालुक्यातील कोरोना बळींची संख्या ११ झाली आहे. आज ९ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४९३ झाली असून ३३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर ११ रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १४६ झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ३९ रुग्ण कोविड केयर सेंटरला भरती असून ९० रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर १७ रुग्ण यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये भालर येथील दोन, गणेशपूर दोन, चिखलगांव एक, देशमुखवाडी एक, पानघाटे ले-आऊट दोन तर सेवानगर येथील एका रुग्णाचा समावेश आहे. कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळविण्याकरिता प्रशासन सर्वोतपरी प्रयत्न करीत असून नागरिकांनीही सावधानी बाळगण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.