WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

लोखंडी गजाने वार करून भावानेच भावाला केले जख्मी !

Image

*प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)*

अवैध रेती व्यवसायाबाबत प्रशासनाला माहिती पुरवीत असल्याचा संशय घेऊन भावंडांमध्ये झालेल्या वादावादीचे पर्यावसन हाणामारीत होतानाच भावानेच भावाच्या डोक्यावर लोखंडी गजाने प्रहार करून जखमी केल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास कोंडावार ले-आऊट येथे उघडकीस आली. याबाबत मिळालेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये शहरातील एका विद्यमान नगरसेवकाचा समावेश आहे.

कोंडावार ले-आऊट येथे राहणाऱ्या धीरज दिगांबर पाते (२८) यांच्या अवैध रेती व्यवसायाबाबत पोलीस प्रशासन व महसूल विभागाला माहिती पुरवीत असल्याचा संशय मनात घेऊन त्यांनी नागेश दिगांबर पाते (३४) यांच्याशी वाद घालून त्त्यांच्यावर लोखंडी गजाने प्रहार करून जख्मी केल्याची तक्रार सुरभी नरेश पाते (२५) रा. कोंडावार ले-आऊट यांनी पोलीस स्टेशनला नोंदविली. पोलिसांनी याप्रकरणात दोन आरोपीं विरुद्ध भादंविच्या कलम ३२४,३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये अंकुश दिगांबर पाते (३८) व धीरज दिगांबर पाते (२८) दोन्ही रा. कोंडावार ले-आऊट यांचा समावेश आहे. अवैध रेती व्यवसाय करीत असल्याची माहिती पोलीस व महसूल विभागाला देण्यात येत असल्याच्या संशयाच्या नादात भावावरच लोखंडी गजाने वार करून जख्मी केल्याने नरेश दिगांबर पाते यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत त्यांच्या पत्नीने पोलीसात तक्रार केल्याने पोलिसांनी गुन्हे दाखल करून तपास सुरु केला आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.