WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादात एकाने दुसऱ्याच्या डोक्यावर मारली लोखंडी सळाख

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

शेजाऱ्यांमध्ये सुरु असलेला वाद विकोपाला जाऊन आपसात झालेल्या मारामारीत एकाने दुसऱ्याच्या डोक्यावर लोखंडी गजाने प्रहार करून जख्मी केल्याची घटना शहरापासून सात किमी अंतरावर असलेल्या राजूर येथे ६ ऑक्टोबरला रात्री ८ वाजता घडली. रमेश मारोतराव देवतळे (५८) रा. राजूर असे जखमीचे नाव असून त्याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शेजारी राहणाऱ्यांमध्ये वाद उत्पन्न होऊन एकमेकांना करण्यात आलेल्या शिवीगाळीने वाद विकोपाला जाऊन आपसात झालेल्या मारामारीत दोघा बापलेकांनी शेजाऱ्याच्या डोक्यावर लोखंडी गजाने वार करून जखमी केले. त्याला जखमी अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याने याबाबत पोलिसांना दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी दोन आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये पुरुषोत्तम रमेश पुसदेकर (३२) व तुफान पुरुषोत्तम पुसदेकर (३५) दोन्ही रा. राजूर यांचा समावेश असून त्यांच्यावर भादंवि च्या कलम ३२४,५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेजाऱ्यांमधील वादाचे पर्यावसान मारामारीत होऊन रमेश मारोतराव देवतळे (५८) यांच्या डोक्यावर लोखंडी गजाने प्रहार करण्यात आल्याने ते चांगलेच जखमी झाले आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.