कृषी उत्पन्न बाजार समिति पांढरकवडा अंतर्गत उपबाजार समिती पाटणबोरी येथे सोयाबीन खरेदीचा शुभारंभ
योगेश मडावी झरी जामणी :-
कृषि उत्पन्न बाजार समिती पांढरकवडा अंतर्गत उपबाजार समिती पाटणबोरी येथे ८ ऑक्टोबरला सभापती गजानन बेजंकीवार यांच्या उपस्थितीत सोयाबीन खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बाजार समितीच्या धान्य खरेदी विभागात झालेल्या उदघाटन समारंभात सोयाबीनचा लिलाव करण्यात आला असता सोयाबीनला ३३७५ रुपये एवढा भाव मिळाल्याने कास्तकारांमध्ये समाधान दिसून आले. उदघाटन प्रसंगी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन बेजंकीवार उपसभापती प्रेमदास राठोड संचालक बिसनसिंग शिंदे अनिल अंगलवार आणि समिती चे सचिव एस. व्ही. खांदनकर तसेच पाटणबोरी येथील सगळे व्यापारी यांनी काटा पुजन करून शेतकरी प्रदीप पांडुरंग उप्परवार रा.पाटणबोरी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कृषि उत्पन्न बाजार समितिचे सभापती गजानन बेजंकीवार यांनी यावेळी शेतकऱ्यांना विनंती केली आपला शेत माल मार्केट यार्ड मध्येच विक्री करिता आणावा. खूप वर्षा नंतर पाटणबोरी येथे धान्यं लिलावास सूरूवात झाली असून शेतकऱ्यांना शेतमालाचा योग्य मोबदला मिळेल व मालाची विक्री करताना शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणी निर्माण होणार नाही याची विशेष काळजी घेतली जाणार असल्याचेही सभापती बेजंकीवार यांनी यावेळी स्पष्ट केले.