तालुक्यातील तीन व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह
शहरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर रोख लागली असून मागील काही दिवसांपासून शहरात कोरोनाचे अतिशय कमी रुग्ण आढळत असल्याने कोरोनाला हद्दपार करण्याकडे प्रशासनाची वाटचाल सुरु झाल्याचे मागील काही दिवसांत आढळलेल्या एकंदरीत रुग्ण संख्येच्या आकड्यांवरून पाहायला मिळत आहे. आज तालुक्यात कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आल्याने एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६७० झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २१ झाली आहे. आज करण्यात आलेल्या २१ रॅपिड अँटीजेन चाचण्यांमध्ये ३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी १५ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, ५ रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात तर एक रुग्ण कोविड केयर सेंटरला उपचार घेत आहे. आज आणखी २१ व्यक्तींचे स्वाब तपासणी करिता पाठविण्यात आल्याने ६५ व्यक्तींच्या नमुन्यांचे अहवाल अप्राप्त आहेत. आज तालुक्यात ३ व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने एकूण पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या ६७० झाली असून ६४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर १९ रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २१ झाली आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये सुकणेगाव, सुंदरनगर व शिवाजी चौक येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. प्रशासन तालुक्याला कोरोनामुक्त करण्याकरिता शर्थीचे प्रयत्न करीत असून नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.