कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढले, कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी !
कोरोना या आजाराविषयी सामाज माध्यमांवरून वेगवेगळ्या अफवा पसरविल्या जात असल्याने नागरिक कोरोनाच्या चाचण्या करून घ्यायला घाबरत आहेत. लक्षनग्रस्त व्यक्तीही घरगुती व ओळखीच्या डॉक्टरांकडून तात्पुरते उपचार करून घेत असल्याने कोरोनाचा आजार बळावत असून प्रकृती खालावल्यानंतर उपचाराकरिता धावाधाव होत असल्याने रुग्णांचे नाहक जीव जात आहेत. कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण आता वाढू लागले असून इतर व्याधींनी ग्रस्त असणारे व प्रतिकार शक्ती कमी असणारे व्यक्ती कोरोनाचे बळी ठरत आहे. त्यामुळे ताप, सर्दी, खोकला ही लक्षणे आढळल्यास प्रत्येकानी कोरोना चाचणी करून घेत आजाराबद्दल निश्चिती करून घेण्याचे आव्हान तालुका आरोग्य अधिकारी अमित शेंडे यांनी केले आहे.
मागील काही दिवसांपासून कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. सोशल मीडिया वरून कोरोना विषयी व उपचार करणाऱ्या डॉक्टरांविषयी अफवा पसरवून नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याने नागरिक कोरोनाच्या चाचण्या करून घ्यायला घाबरत आहेत. लक्षनग्रस्त नागरिकही कोरोनाची चाचणी करून न घेता घरगुती व डॉक्टरांकडून तात्पुरते उपचार करून घेत असल्याने कोरोनाचा आजार बळावत असून प्रकृती गंभीर झाल्यानंतर धावाधाव केल्या जात असल्याने योग्य उपचाराअभावी रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. कोरोना संदर्भात वेगवेगळ्या अफवांना पेव फुटले असल्याने नागरिकांमध्ये कोरोना विषयी अनेक गरसमज निर्माण झाले आहे. उपचार करणाऱ्या डॉक्टरांविषयी अफवांचा बाजार गरम असल्याने चाचण्या करताना त्यांच्यावर संशय घेतला जात आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी या शासनाच्या कोरोनामुक्त अभियानांतर्गत गावोगावी मार्गदर्शन व तपासण्या करण्याकरिता जाणाऱ्या आरोग्य सेवक व आशा सेविकांना नागरिकांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. नागरिक आरोग्य पथकाचे काही एक ऐकून न घेता आरोग्य सेवकांशी हुज्जत घालतांना दिसतात. कोरोना चाचण्या केल्या की त्या पॉझिटिव्हच येतात हा नागरिकांमध्ये गैरसमज पसरविल्या गेला आहे. त्यामुळे शहर व गाव पातळीवर कोरोनाच्या जनजागृती करिता गेलेल्या आरोग्य पथकाला योग्य प्रतिसाद न मिळता नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या नागरिकांनी रॅपिड अँटीजेन चाचणी केल्यास त्याचा एका तासात रिपोर्ट मिळतो व पॉझिटिव्ह आल्यास आपली दैनंदिन कामे सांभाळूनही कोरोनावर उपचार घेता येतो. आता तर होम आयसोलेशची सुविधाही देण्यात येत आहे. तेंव्हा स्वतःचे व कुटुंबाचे आरोग्य धोक्यात न घालता वेळेतच कोरोना चाचणी गरजेचे आहे. ताप, सर्दी, खोकला झाल्यास नागरिक हवामानाचा बदल समजून या आजाराकडे दुलक्ष करतात. तर काही व्यक्ती निमोनिया, टायफाईड समजून त्या चाचण्या करण्याकडे भर देतात. त्या चाचण्या करण्याबरोबरच सध्या चालतीत असलेल्या कोरोनाचीही चाचणी करून घ्यावी. अन्यथा हा आजार बळावल्या नंतर ऑक्सिजनवर ठेवण्याची वेळ येते व काम खूपच कठीण होऊन बसतं. तेंव्हा आपले कुटुंब, आपली जबाबदारी समजून कोरोना सदृश्य आढळलेल्यानी तसेच इतर व्याधिग्रस्त वृद्ध व्यक्ती व प्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींनीही कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यास आधी कोरोना चाचणी करून घेण्याचे आव्हान आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे. एखाद्याची प्रतिकारशक्ती दांडगी असेल तर त्याचा प्राथमिक उपचारांनी कोरोना बरा होत असला तरी त्याच्या पासून इतर व्यक्तींना कोरोना झाल्यास व त्यांची प्रतिकार शक्ती कमी असल्यास किंवा तो इतर व्याधींनीग्रस्त असल्यास त्याच्यावर कोरोनाचा जास्त परिणाम होतो. त्यामुळे कोरोना सदृश्य लक्षणे आढळ्यास सर्वप्रथम खाजगी किंवा शासकीय कोविड सेंटरमध्ये जाऊन कोरोना चाचणी करण्याचे आव्हान तालुका आरोग्य अधिकारी अमित शेंडे यांनी केले आहे.