तालुक्यात आज आढळले १४ कोरोना बाधित रुग्ण
corona update २० oct
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)
तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असतांनाच आज अचानक प्रतिदिन आढळणाऱ्या रुग्णसंख्येत थोडी वाढ झाली आहे. आज १४ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७२४ झाली. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढून ५३ झाली आहे.
शहर व तालुक्यात कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण कमी झाले असतानाच आज प्रतिदिन आढळणाऱ्या रुग्णसंख्येत किंचित वाढ झाली आहे. आज प्राप्त झालेल्या ३२ तपासणी अहवालामध्ये ६ व्यक्ती पॉझिटिव्ह तर २६ व्यक्ती निगेटिव्ह आढळून आले आहेत. तसेच आज करण्यात आलेल्या ३१ रॅपिड अँटीजेन चाचण्यांच्या रिपोर्टमध्ये ८ व्यक्ती पॉझिटिव्ह तर २३ व्यक्ती निगेटिव्ह आढळून आले आहेत. आज आणखी ५२ व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने १०० नमुन्यांचे रिपोर्ट पेंडिंग झाले आहेत. आता पर्यंत एकूण ५२०४ व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. आज १४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात ७२४ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून ६७० रुग्ण कोरोनामुक्त झाले तर २० रुग्णांचा मृत्यू झाल्याने ५३ ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी २२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, २० रुग्ण कोविड केयर सेंटरमध्ये तर ११ रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात भरती आहेत. सध्यास्थितीत २१ व्यक्ती संस्थात्मक विलीगीकरणात आहेत.
आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये सुंदरनगर येथील चार, कुरई येथील सात, जत्रा रोड, रंगारीपुरा व टागोर चौक येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. प्रशासन कोरोनाचे संक्रमण वाढू नये, याकरिता योग्य त्या उपाययोजना करीत असून नागरिकांनीही सावधानी बाळगण्याचे आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.