तालुक्यात आज आढळले कोरोनाचे तब्बल २२ रुग्ण
corona update २१ oct
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)
शहर व तालुक्यात आज कोरोनाने कहर केला असून प्रतिदिन आढळणाऱ्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकांची धाक धुकं वाढली आहे. आज तालुक्यात कोरोनाचे २२ रुग्ण आढळल्याने प्रशासन चिंतेत आले आहे. आज २२ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७४६ झाली. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७१ झाली आहे. आज आणखी चार रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत एकूण ६७४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
तालुक्यात आज मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. प्रतिदिन कमी प्रमाणात आढळणाऱ्या रुग्णांमध्ये आज अचानक लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांमध्ये परत एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज पूर्ण ८६ तपासणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून २० पॉझिटिव्ह तर ६६ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज ७८ व्यक्तींच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या असून २ पॉझिटिव्ह तर ७६ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज आणखी ५० व्यक्तींचे स्वाब तपासणी करिता पाठविण्यात आले असून तेवढ्याच नमुन्यांचे रिपोर्ट पेंडिंग आहेत. आता पर्यंत एकूण ५३३२ व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तालुक्यात आज २२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ७४६ वर पोहचला असून ६७४ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर २० रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७१ झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ४१ रुग्ण कोविड केयर सेंटरमध्ये, ११ रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयामध्ये तर १९ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. सध्यास्थितीत ५२ रुग्ण संस्थात्मक विलीगीकरणात आहेत.
आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये सुंदरनगर येथील चार, कुरई पाच, चिखलगांव तीन, पोलीस क्वाटर येथील चार तर भालर, निवली, रामपुरा, तेजापूर, तेलीफैल, न.प. शाळा क्रं. १ जवळील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. पोलीस विभागात कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत असून एकवेळ कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या तैलीफैल परिसरात कोरोनाने परत डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. प्रशासन कोरोनावर नियंत्रण मिळविण्याकरिता शर्थीचे प्रयत्न करीत असून नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.