WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

अबब, भालर शेत शिवारात आढळला १२ फूट लांबीचा भला मोठा अजगर

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

वणी तालुक्यातील भालर शेत शिवारात १२ फूट लांबीचा अजगर आढळल्याने शेतात काम करणाऱ्या लोकांच्या उरात चांगलीच धडकी भरली. लॅब्रा जातीचा कुत्रा या अजगराने गिळंकृत केल्याचे लक्षात येताच शेतात काम करणाऱ्यांची पाचवर धारण बसली. तेथील लोकांनी सर्प मित्रांना शेतात अजगर असल्याबाबत माहिती दिली असता युवा सर्प मित्रांनी शेत शिवार गाठत अथक प्रत्नानी अजगराला पकडल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास टाकला.

शहरापासून जवळच असलेल्या भालर येथील शालिकराव धांडे यांच्या शेतात आज २१ ऑक्टोबरला दुपारच्या सुमारास भला मोठा अजगर दिसल्याने शेतात काम करणाऱ्यांच्या पाचावर धारण बसली. या अजगराने लॅब्रा जातीचा कुत्रा गिळंकृत केल्याचे लोकांच्या लक्षात येताच लोकांनी सर्प मित्रांना याबाबत माहिती दिली असता युवा सर्प मित्रांनी धांडे यांचे शेत गाठत शर्थीचे प्रयत्न करून १२ फूट लांब व अंदाजे ३५ किलो वजनाचा अजगर पकडून वन विभागाच्या स्वाधीन केले. भालर शेतशिवारात अजगर असल्याची खूप दिवसांपासून गावात चर्चा होती. पण प्रत्येक्षात आज गावकऱ्यांना अजगराचे दर्शन झाल्याने सर्प मित्र ग्रुपला पाचारण करून त्यांनी अजगराला पकडल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला असून भला मोठा अजगर शिताफीने पकडल्याबद्दल सर्प मित्रांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share