WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

पूर्णा पटना साप्ताहिक एक्सप्रेस वनी वरून सुरु

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउनचा फटका प्रवासी रेल्वे वाहतुकीलाही चांगलाच बसला. जनसंपर्कातून कोरोनाचे संक्रमण वाढू नये याकरिता संपूर्ण प्रवासी रेल्वे गाड्या बंद ठेवण्यात आल्याने रेल्वेला कोट्यावधीचा आर्थिक तुटवडा सहन करावा लागला. परंतु आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर रेल्वेची प्रवासी वाहतूकही टप्याटप्याने सुरु करण्यात आली. थांबलेली रेल्वे प्रवासी वाहतुकीची चाके आता धावू लागली आहेत. रेल्वेच्या प्रवासी गाड्यांनी प्रवाशांचा ठिकठिकाणचा प्रवास सुरु झाला असला तरी तालुक्यातील जनतेच्या रेल्वे प्रवासाची धुरा सांभाळणारी एकमेव दैनंदिन प्रवासी रेल्वे गाडी नंदीग्राम एक्सप्रेस अद्यापही वणी मार्गे नागपूरपर्यंत वाढविण्यात न आल्याने तालुकावासीयांचा चांगलाच हिरमोड झाला असताना २३ ऑक्टोबर पासून पूर्णा पटना साप्ताहिक प्रवासी रेल्वे गाडी सुरु झाल्याने तालुक्यात रोजगारानिमित्त वसलेल्या परप्रांतीय जनतेच्या प्रवासाचा मार्ग सुकर झाला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने प्रवासी रेल्वे वाहतूकही बंद ठेवण्यात आली होती. परंतु आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्याने रेल्वे प्रवासी वाहतूक टप्याटप्याने सुरु करण्यात येत आहे. ठिकठिकाणच्या रेल्वे प्रवास सुरु झाला असताना तालुक्यातील रेल्वे प्रवासाला प्राथमिकता देणारी जनता नंदीग्राम एक्सप्रेस सुरु होण्याची चातका सारखी वाट पहात असताना ही गाडी नांदेड पर्यंतच येत असल्याचे कळल्याने तालुक्यातील प्रवाशांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. २३ ऑक्टोबर पासून पूर्णा पटना ही साप्ताहिक प्रवासी रेल्वे गाडी सुरु करण्यात आल्याने परप्रांतीय प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. तालुक्यात शेकडो परप्रांतीय नागरिक रोजगारानिमित्त वसले आहेत. दिवाळी साजरी करण्याकरिता ते आपापल्या गावी जातात. दिवाळीच्या मुहूर्तावर पूर्णा पटना ही साप्ताहिक रेल्वे प्रवासी गाडी सुरु झाल्याने परप्रांतीयांचा प्रवासाचा मार्ग सुकर झाला आहे. पुर्णाहून पटनाकडे जाणारी रेल्वे सोमवारला रात्री १२.४५ वाजता वणी स्थानकावरून सुटते तर पटनाकडून पूर्णाकडे जाणारी रेल्वे सोमवारलाच रात्री ११.१० वाजता वणी स्थानकावरून सुटते. लॉकडाऊन आधी वणी रेल्वे स्थानकावर वरून चार साप्ताहिक रेल्वे जायच्या. त्यामध्ये कोलकाता नांदेड संत्रकांजी एक्सप्रेस, धनबाद कोल्हापूर दीक्षाभूमी एक्सप्रेस, काजीपेठ मुंबई ताडोबा एक्सप्रेस व पूर्णा पटना एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश होता. त्यापैकी २३ ऑक्टोबर पासून पूर्णा पटना ही साप्ताहिक रेल्वे प्रवासी गाडी सुरु झाली आहे. वणी वासियांना आता वेध लागले आहे ते नंदीग्राम एक्सप्रेस सुरु होण्याचे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share