तालुक्यात आढळले आज करोनाचे पाच रुग्ण
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)
तालुक्यात आज प्रतिदीन आढळणारऱ्या कोरोनाच्या रुग्णांत घट झाली असून आज तालुक्यात 5 व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामूळे तालुक्यातील एकुण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढून 778 झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 26 झाली आहे. आता पर्यंत 749 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
तालुक्यात आज पॉझिटीव्ह आढळणार्या रुग्णांच्या संख्येत घट झाली असून आज 5 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज तपासणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले नसुन आज पॉझिटीव्ह आलेले रुग्ण रॉपीड अँटीजन चाचणीच्या माध्यमातून आले आहेत. आज 14 व्यक्तींची रॉपिड़ अँटीजन चाचणी करण्यात आली असून 5 पॉझिटीव्ह तर 9 व्यक्तींचे रेपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. आज आणखी 19 व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने 59 नमुन्यांचे अहवाल प्राप्त होणे बाकी आहे. आता पर्यंत एकुण 5737 जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तालुक्यात आज 5 व्यक्ती पॉझिटीव्ह आल्याने एकुण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 778 झाली असून 749 रुग्ण कोरोनामुक्त झाले तर 20 रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 26 झाली आहे. पॉझिटीव्ह रुग्णांपैकी 14 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, 8 रुग्ण कोविड केयर सेंटरमध्ये तर 4 व्यक्ती यवतमाळ शासकीय रुग्णालयात भरती आहेत.
आज पॉझिटीव्ह आलेल्या व्यक्तींमधे गणेशपूर येथील तीन, सेवानगर येथील एक तर जी.प. कॉलनी येथील एका व्यक्तिचा समावेश आहे.