तालुक्यातील नऊ व्यक्तींना झाली आज कोरोनाची लागण
corona update ३ Nov.
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)
तालुक्यात प्रतिदिन आढळणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत आज काहीशी वाढ झाली असून आज नऊ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७८८ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३३ झाली आहे. आज आणखी रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतल्याने एकूण कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ७५२ झाली आहे.
शहर व तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात कमी झाला असून कोरोना रुग्णांची जलद गतीने वाढणारी रुग्णसंख्याही नियंत्रणात आली आहे. तालुक्यातील ३९ तपासणी नमुन्यांचे अहवाल आज प्राप्त झाले असून ४ पॉझिटिव्ह तर ३५ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज २५ व्यक्तींची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली असून ५ व्यक्ती पॉझिटिव्ह तर २० व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज आणखी २२ व्यक्तींचे स्वाब तपासणी करिता पाठविण्यात आल्याने ५० अहवाल प्रलंबित झाले आहे. आता पर्यंत ५८०६ व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तालुक्यात आज नऊ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्याने एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ७८८ झाली असून ७५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर २० रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३३ झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी १४ रुग्ण कोविड केयर सेंटरमध्ये, १० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर ९ रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत.
तालुक्यात आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये गणेशपूर येथील दोन, सर्वोदय चौक दोन, शिंदोला, मारेगांव, सुकणेगाव, पळसोनी येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश असून नगर परिषदेजवळील एका व्यक्तीचा समावेश आहे. कोरोना संक्रमणाला चालना मिळणार नाही याकरिता प्रशासनाने सुचविलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.