नगर पालिकेतील लाखो रुपयांच्या अपहार प्रकरणी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)
नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागातील लाखो रुपयांच्या अपहार प्रकरणी पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविण्यात आली आहे. न.प. च्या पाणी पुरवठा विभागाचे अभियंता शुभम आनंदराव तायडे (23) यानी दिलेल्या तक्रारी वरुन अंकित रामचंद्र कोयचाडे (25) रा.वनी याच्या विरुध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
न.प. च्या पाणी पुरवठा विभागांतर्गत करण्यात आलेल्या पाणीकर वसुलीतील रक्कमेत लाखो रुपयांची तफावत असल्याचे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. 2019 ते 2020 या वर्षातील पाणीकर वसुलीतील रक्कमेत लाखो रुपयांची अफरातफर झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकाराबाबत नगराध्यक्ष तारेण्द्र बोर्डे यानी 23 ऑक्टोंबरला मुख्यधिकर्यांकडे तक्रार केली होती. एप्रिल 2019 ते ऑक्टोंबर 2020 या काळातील पाणीकर वसुलीतील रक्कमेत मोठा घोळ आढळून आला. रोखपालाणे सादर केलेल्या कर वसुलीत चालाण दिसून आल्या नाहित. 22 ऑक्टोंबरला पाणी पुरवठा विभागाने वसुलिचा आढावा घेतला त्यात एप्रिल ते ऑक्टोंबर 2020 या काळातील पानीकर वसुलीची रक्कम अंकित कोयचाडे यानी नगर परिषद कोषागारात जमा केली नसल्याचे आढळून आले. एप्रिल 2019 ते ऑक्टोंबर 2020 या काळात एकुण 71 लाख 33 हजार 110 रुपयांची पाणी कर वसुली झाली त्यात 17 लाख 34 हजार 758 रुपयांची तफावत आढळून आली. अंकित कोयचाडे यानी 17 लाख 34 हजार 110 रुपयांची अफरातफर केल्याचे सिद्ध झाल्याने न.प. पुरवठा विभागाचे अभियंता शुभम तायडे यानी अंकित कोयचाडे यांच्या विरुध्द पाणी कर वसुलीच्या रक्कमेत अफरातफर केल्याची तक्रार ३ ऑक्टोबरला पोलीस स्टेशनला दाखल केली. तक्रारीवरुन पोलिसांनी अंकित कोयचाडे यांच्या विरुध्द भादंविच्या कलम 409 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.