तालुक्यात आढळले आज कोरोनाचे सहा रुग्ण

corona update ५ Nov.
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)
तालुक्यात आज सहा कोरोनाबाधित रुग्ण आढळळून आल्याने एकूण कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ७९८ वर पोहचला आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४० झाली आहे. आणखी तीन कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना सुटी देण्यात आल्याने एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ७५५ झाली आहे.
तालुक्यातील कोरोनाचा कहर कमी झाला असून कोरोना रुग्णांची वाढती संख्याही नियंत्रणात आली आहे. प्रतिदिन आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाली असून कोरोना मावळतीकडे जात असल्याचे पाहायला मिळत आहे. तालुक्यातील २६ तपासणी नमुन्यांचे अहवाल आज प्राप्त झाले असून ६ पॉझिटिव्ह तर २० नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज २६ रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या असून सर्वच चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज आणखी १७ व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने ३२ नमुन्यांचे अहवाल पेंडिंग झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी २४ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, ७ रुग्ण कोविड केयर सेंटरमध्ये तर ९ रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात भरती आहेत.
आज पॉझिटिव्ह आलेले सहाही रुग्ण द्वारका अपार्टमेंट मधील आहेत.