तालुक्यात आज कोरोनाचे तब्बल २३ रुग्ण आढळले तर एक रुग्ण कोरोनाने दगावला !

corona update १० Nov.
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)
तालुक्यात आज कोरोनाने धमाका केला असून कोरोनाचे तब्बल २३ रुग्ण आढळले आहेत. प्रतिदिन कमी प्रमाणात आढळणाऱ्या रुग्णसंख्येत आज अचानक वाढ झाल्याने प्रशासन चिंतेत आले आहे. तसेच पुनवट येथील एका व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाल्याने तालुक्यातील कोरोनाबळींची संख्या २१ झाली आहे. कोरोनाचे उपचार सुरु असताना सदर रुग्ण दगावल्याने तालुक्यात परत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. थंड वातावरण कोरोनाचा संसर्ग वाढण्यास पूरक ठरत असल्याने हिवाळ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या २३ रुग्णांमुळे तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८४४ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढून ६६ झाली आहे. आज आणखी पाच रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ७७५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
तालुक्यात थंडी वाढू लागल्याने साथीचे आजार बळावू लागले आहेत. डेंग्यू मलेरिया सारखे साथीचे आजारही तालुक्यात वाढले आहेत. थंडे वातावरण कोरोना वाढीस पूरक ठरत असल्याने वाढणारी थंडी कोरोनाचे संक्रमण वाढण्यास कारणीभूत ठरते की काय, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. मागील दोन तीन दिवसांपासून प्रलंबित असलेले तपासणी नमुन्यांचे अहवाल आज प्राप्त झाले आहेत. प्राप्त झालेल्या ८० तपासणी नमुन्यांच्या अहवालामध्ये १९ व्यक्ती पॉझिटिव्ह तर ६१ व्यक्ती निगेटिव्ह आढळून आल्या आहेत. तसेच आज करण्यात आलेल्या २१ रॅपिड अँटीजेन चाचण्यांमध्ये ४ व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. आज आणखी चार व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने ४४ अहवाल अप्राप्त आहेत. तालुक्यात आज तब्बल २३ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८४४ झाली असून ७७५ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर २१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६६ झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ३३ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर ३३ रुग्ण कोविड केयर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. आज आणखी एका कोरोना बाधित रुग्णाचा उपचारादरम्यात मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये परत कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये पुनवट येथील नऊ, शहरातील आठ, पळसोनी दोन, गणेशपूर, सुकणेगाव, भांदेवाडा, कानडा येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. नागरिकांनी सावधानी बाळगण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.