WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

18 ला वणीत युवा शक्तीचा विराट मोर्चा

Image

Image

युवा शक्ती वणी,मारेगाव व झरी तालुका द्वारा दिनांक 18 जानेवारी शुक्रवारला सकाळी 11 वाजता युवकांच्या व शेतकऱ्यांच्या हक्कासाठी विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

Image

आज वाढत्या बेरोजगारीमुळे अनेक सुशिक्षित युवक आणि युवती रोजगारा पासून वंचित आहे.शेतकरी माय-बाप शेतात राबत आहे पण त्यांच्या शेतमालाला भाव नाही युवक आणि युवतीला जर व्यवसाय करायचा असल्यास त्यांना कोणत्याही बँक कडून अर्थसहाय्य सुद्धा मिळत नसल्याने हताश झालेले आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता दिनांक 18 जानेवारी 2019 ला सकाळी 11 वाजता युवा शक्ती वणी ,मारेगाव व झरी यांच्या वतीने अँड.सुरज महारतळे यांच्या नेत्रत्वात शासकीय मैदानावरून विराट मोर्चा निघणार आहे.

प्रमुख मागण्या

१) युवकांना सरकारी नोकऱ्यात समावेश करून घेण्यात यावा .
२) युवकांना व्यवसायासाठी गैरजमानती अर्थसाहाय्य मिळण्यात यावे.
३) शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी.
४) बेरोजगार युवकांना दरमहा रु. १०००० बेकारी भत्ता मिळण्यासाठी.

हे प्रमुख उद्दिष्टे घेऊन उपविभागीय अधिकाऱ्याच्या माध्यमातून मा. मुख्यमंत्री साहेबाकडे निवेदन देण्यात येणार आहे. त्यानंतर शासकीय मैदानावर सभा होणार आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.