WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कोळसा खदानींशी निगडित प्रा. लि. कंपन्यांमध्ये स्थानिकांना डावलून बाहेरच्यांचा भरणा

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

कोळसा खदानींचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वणी तालुक्यात बेरोजगारी वाढू लागली आहे. तालुका खदानींनी वेढलेला असतानाही स्थानिक युवकांच्या हाताला काम नसल्याने रोजगाराची बिकट समस्या निर्माण झाली आहे. कोळसा खदानींशी निगडित अनेक प्रा. लि. कंपन्या तालुक्यात अवतरल्या असतानाही स्थानिकांना रोजगार मिळत नसल्याने युवकांमध्ये नैराश्य निर्माण झाले आहे. कोळसा खदानींच्या विस्तारीकरणाकरिता खदानींशी करार करून आलेल्या चार ते पाच प्रा. लि. कंपन्या तालुक्यातील खदान क्षेत्रात कार्यरत आहेत. परंतु या कंपन्यांमध्ये स्थानिकांना पाहिजे त्या प्रमाणात रोजगाराचा वाटा मिळाला नाही. या परप्रांतीय कंपन्यांनी स्थानिकांना डावलून परजिल्हा व परप्रांतातील लोकांना मोठ्या प्रमाणात सामावून घेतल्याने स्थानिकांमध्ये रोष दिसून येत आहे.

खनिज संपतीनी निपुण असलेल्या वणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण झाली आहे. तालुक्यात अनेक कोळसा खाणी असतानाही रोजगाराच्या वाटा उपलब्ध होत नसल्याने स्थानिक युवकांमध्ये नैराश्य निर्माण झाले आहे. तालुक्यातील युवक रोजगाराकरिता वणवण भटकताना दिसत आहे. कोळसा खदानींच्या प्रदूषणापासून तर ब्लाशटिंगपर्यंतच्या अनेक समस्यांचा सामना करणाऱ्या स्थानिकांना मात्र रोगारांच्या संधींपासून नेहमी विभक्त ठेवण्यात आलं आहे. खदानींच्या विस्तारीकरणाकरिता तालुक्यातील खदान क्षेत्रात चार ते पाच बड्या कंपन्या अवतरल्या आहेत. कोलारपिंपरी, उकणी, निलजई, मुंगोली या खदानींचे विस्तारीकरणाचे काम सुरु असून भूगर्भातून कोळसा काढण्यापर्यंतच्या करारावर अनेक प्रा. लि. कंपन्या खदान क्षेत्रात कार्यरत आहेत. खदान क्षेत्रात बड्या कंपन्या येणार असल्याने तालुक्यातील बेरोजगारी दूर होईल हा स्थानिकांचा गैरसमज क्षणार्धात दूर झाला. कंपन्यांनी स्थानिकांना डावलून ७० टक्के परप्रांतीय व परजिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचा भरणा केला. स्थानिकांचा विटाळ झाल्यागत त्यांना दूर लोटल्या गेले. कंपनीच्या चकरा मारणाऱ्या स्थानिक युवकांसाठी नो व्हॅकन्सीची व्याख्याच तयार करून ठेवण्यात आली. ज्याठिकाणी कंपनीची स्थापना केली जाते तेथील ८० टक्के भूमी पुत्रांना रोजगार मिळावा या शासनाच्या अपेक्षा असताना याठिकाणी कार्यरत कंपन्या स्थानिकांवर पूर्णतः अन्याय करीत आहे. निवणूक काळात रोजगारांचे मुद्दे ओरडून मांडणारे लोकप्रतिनिधीही आज चुप्पी साधून आहेत. स्थानिकांचा फक्त वापर करून घेतल्या जातो व नंतर त्यांच्या समस्यांकडे डोळेझाक केल्या जाते. लॉकडाऊन काळात परप्रांतीयांनी पळ काढल्यानंतर कंपन्यांनी स्थानिकांना सामावून तर घेतले पण आता परप्रांतीय परतू लागल्याने स्थानिकांना नानाविध प्रकारे त्रास देऊन, त्यांच्या कामांमध्ये चुका काढून त्यांना कामावरून कमी केल्या जात आहे. त्यामुळे रोजगाराची समस्या आणखीच गडद होताना दिसत आहे. तालुक्यात असंख्य कोळसा खाणी असल्या तरी कोळश्यावर आधारित उद्योग व्यवसायांमध्ये परप्रांतियांचाच भरणा दिसून येतो. त्यामुळे ते स्थानिक लोकांपेक्षा परप्रांतीय लोकांना रोजगाराकरिता जास्त प्राधान्य देतात. काही प्रमाणात स्थानिकाना रोजगार दिलाही तरी त्यांना सापत्न वागणूक मिळते. तालुक्यात खदानींशी निगडित बड्या कंपन्या अवतरल्या असल्या तरी स्थानिकांसाठी त्या मृगजळ ठरल्या आहेत. आता तर कोणतीही मोठी कंपनी तालुक्यात आली की, नागरिक नैराशेने एकमेकांना विचारतात आपल्याला रोजगार मिळेल काय या कंपनीत. स्थानिकांना डावलून बाहेरील कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात येत असल्याने रोजगाराच्या वाटा निर्माण होऊनही रोजगार मिळत नसल्याने स्थानीक युवक नैराशेच्या गर्तेत आले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share