WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

सेवानगर येथे महिलेला अश्लील शिवीगाळ करून मारण्याची धमकी

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

महिलेला अश्लील शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी सेवानगर येथील इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिलेच्या घरा शेजारीच राहत असलेल्या सुभाष रामा डुबे (४०) याने १८ नोव्हेंबरच्या रात्री ९ वाजता महिलेला रस्त्यात गाठून अश्लील शिवीगाळ करीत अंगावर चाल करून जातानाच मारण्याची धमकी दिल्याची तक्रार सदर महिलेने वणी पोलीस स्टेशनला नोंदविली आहे.

स्थानिक सेवानगर येथे वास्तव्यास असलेली महिला त्याच परिसरातील आपल्या मावशीकडे जेवण आटपून घराकडे परतत असताना आरोपी सुभाष डूबे याने तिला रस्त्यात अडवून अश्लील भाषेत शिवीगाळ करतानाच अंगावर चाल करीत मारहाण करण्याची धमकी दिली. सोबत असलेल्या मावशीने मध्यस्थी केल्याने महिला मारहाणीपासून वाचली. पण शिवीगाळ जिव्हारी लागल्याने तिने आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. आरोपी हा महिलेच्या घरा शेजारी रहात असून नळाचे पाणी भारण्यावरून नेहमी तो महिलेशी वाद घालत होता. १८ नोव्हेंबरला महिला मावशीच्या घरी जेवण करून स्वतःच्या घराकडे परतत असताना आरोपीने तिला घराकडे जाण्याच्या रस्त्यावर अडवून अश्लील भाषेत शिवीगाळ करतानाच अंगावर चाल करीत मारण्याची धमकी दिली. मावशी सोबत असल्याने महिला मारहाणीपासून थोडक्यात बचावली. कल्लोळ ऐकून महिलेची सासू घटना स्थळी आली व महिलेला सोबत घेऊन गेली. अश्लील शिवीगाळ केल्याने अपमानित झालेल्या महिलेने पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याने पोलिसांनी आरोपी विरुद्ध भादंवि च्या कलम २९४ ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास पोलीस करीत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.