WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शहरातून जाणाऱ्या वणी वरोरा रोडवर ठिकठिकाणी पडले खड्डे

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

शहरातून जाणाऱ्या वनी वरोरा रोडवर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने रहदारीस अडथळे निर्माण होत असून खड्डे चुकविण्याच्या नादात अचानक वाहने वळविली जात असल्याने याठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्य रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे उघड्या डोळ्यानी दिसत असतानाही संबंधित विभाग या खड्ड्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करित असल्याचे दिसून येत आहे. दुर्घटना घडल्या नंतरच खड्डे बुजविण्यात येते की, काय हा प्रश्न निर्माण झाला आहे.

वनी वरोरा रोड वरिल आशिर्वाद बार जवळ व लोकमान्य टिळक कॉलेज जवळ रस्त्याच्या मधोमध मोठमोठे खड्डे पडले आहेत. नगर पालिकेतील कित्येक कर्मचारी या रस्त्यानी जाने येणे करतात पण कुणाच्याही दृष्टीस हे खड्डे पडू नये, याचेच नवल वाटते. नगर पालिकेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व बांधकाम सभापतीही या रस्त्याने गेले असतील पण कुणीही खड्डे बुजविण्याकरिता संबंधित विभागाला धारेवर धरताना दिसत नाही. बाजाराकडे जाणारा हा मुख्य मार्ग असल्याने या रस्त्यावर नेहमी वाहनांची रेलचेल असते. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रहदारीला अडथळे निर्माण होत असून खड्डे चुकविण्याच्या नादात वाहन चालकांचा तोल जाऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खड्डे असलेल्या ठिकाणावरून अचानक वाहने वळविली जात असल्याने समोरुन व मागुन येणारे वाहन चालक गोंधळत असून वाहन चालकांचे संतुलन बिघडून याठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्य रस्त्याच्या मधोमध मोठमोठे खड्डे पडूनही संबंधित विभाग याकडे डोळेझाक करित आहे, याचेच नवल वाटते. दुर्घटना घडल्यानंतरच संबंधित विभागाला जाग येते की, काय असे वाटू लागले आहे. शहरातील गल्लीबोळात रस्ते निर्माण व दुरुस्तीकरणाचा सपाटा सुरू असताना मुख्य रस्त्यांवरील खड्डे दुर्लक्षित रहावे ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. अपघातास कारणीभूत ठरू पाहणारे मुख्य रस्त्यावरील खड्डे वेळीच बुजविन्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share