WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तालुक्यातील पाच व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

Image

corona update २० Nov.

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

तालुक्यात कोरोना संक्रमणाची गती मंदावली असली तरी कमी अधिक प्रमाणात रुग्ण आढळून येत असल्याने रुग्णांचा आलेख वाढतच चालला आहे. आज पाच व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९२२ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७४ झाली आहे. आज आणखी एक रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतल्याने एकूण कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ८२५ झाली आहे. आज पॉझिटिव्ह आलेले पाचही रुग्ण रॅपिड अँटीजेन द्वारा करण्यात आलेल्या चाचणीतून आले आहेत. रॅपिड अँटीजेन चाचणी तात्काळ आजाराचे निदान लागण्याकरिता आरोग्य विभागाकडून करण्यात येते. या चाचणी करिता वारंवार नमुने घेतल्यास निगेटिव्ह टु पॉझिटिव्ह रिपोर्ट येऊ शकतात, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत आहे. या चाचणीचे ५० टक्के निदान ग्राह्य धरल्या जातं. या चाचणीत निगेटिव्ह आलेल्यानंतरही आरटीपीसीआर चाचणी करण्यात येते. आरटीपीसीआर चाचणीचे ८० टक्के निदान बिनचूक असतात. तपासणी अहवालामध्ये पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आल्यास ते खात्रीदायक समजल्या जातं. लक्षणे असलेल्यांची आधी अँटीजेन चाचणी करण्यात येते, रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास आणखी खात्री करून घेण्याकरिता त्यांची आरटीपीसीआर चाचणीही करण्यात येत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

प्रतिदिन कोरोनाचे कमी अधिक प्रमाणात रुग्ण आढळत असल्याने रुग्णसंख्या कधी संत गतीने तर कधी तीव्र गतीने वाढतच चालली आहे. आज करण्यात आलेल्या ९४ व्यक्तींच्या रॅपिड अँटीजेन चाचण्यांच्या रिपोर्टमध्ये ५ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आज तपासणी अहवाल प्राप्त झाले नसून आज आणखी २९ व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने ६५ अहवाल प्रलंबित आहेत. तालुक्यात आज पाच व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९२२ झाली असून ८२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर २३ रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७४ झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ३६ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, १९ रुग्ण कोविड केयर सेंटरमध्ये तर १९ रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालय व इतरत्र उपचार घेत आहेत.

आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये आंबेडकर चौक येथील तीन, रवी नगर येथील एक तर राजूर कॉलरी येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. नागरिकांनी सावधानी बाळगण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share