तालुक्यातील आणखी पाच व्यक्तींना झाली कोरोनाची लागण
corona update २२ Nov.
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)
तालुक्यात प्रतीदीन कमी अधिक प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने रुग्णसंख्येत निरंतर वाढ होतांना दिसत आहे. असे असले तरी कोरोना चाचन्यांमध्ये निगेटिव्ह अहवाल येण्याचे प्रमाण वाढल्याने कोरोनाची परिस्थिती नियंत्राणत असल्याचे सध्यातरी दिसून येत आहे. या आजारातून पुष्कळसे रुग्ण उपचार घेऊन बरे होत असल्याने नागरिकांमध्ये समाधान पहायला मिळत आहे. तालुक्यात आज पाच व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याने एकुण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 934 झाली तर ऍक्टिव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या रुग्णांची संख्या 73 झाली आहे. आणखी 8 रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत 838 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर 23 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
आज करण्यात आलेल्या 89 रॅपिड अँटीजन चाचण्यांमध्ये पाच व्यक्ती पॉझिटीव्ह तर 84 व्यक्तींचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहे. आज तपासणी अहवाल प्राप्त झाले नसुन आज आणखी 38 व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने 135 अहवाल प्राप्त होणे बाकी आहेत. आता पर्यंत एकुण 6970 व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. पॉझिटीव्ह रुग्णांपैकी 43 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, 9 रुग्ण कोविड केयर सेंटरमध्ये तर 21 रुग्ण यवतमाळ व इतरत्र उपचार घेत आहेत.
आज पॉझिटीव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये वसंतगंगा विहार येथील एक, आंबेडकर चौक एक, राजूर कॉलरी एक, चिखलगाव एक तर लालगूड़ा येथील एका व्यक्तिचा समावेश आहे.