WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तालुक्यातील सात व्यक्तींना झाली कोरोनाची लागण

Image

corona update २४ Nov.

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

तालुक्यात आज सात व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९४६ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८१ वर पोहचली आहे. आज आणखी एक रुग्ण कोरोनातून बरा झाल्याने त्याला सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत एकूण ८४२ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर २३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

कोरोना संक्रमणाची गती मंदावली असली तरी रुग्णवाढ सुरूच असून कोरोनाला शहर व तालुक्यातून हद्दपार करण्याकरिता प्रशासन निरनिराळ्या उपाययोजना अमलात आणत आहे. आज प्राप्त झालेल्या ४२ तपासणी अहवालामध्ये एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आला तर आज करण्यात आलेल्या ४९ रॅपिड अँटीजेन चाचण्यांमध्ये सहा व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. आता पर्यंत ३६२४ व्यक्तींच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या तर ३५३२ व्यक्तींच्या रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. आज आणखी ४८ व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने १६५ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. तालुक्यात आज सात व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याने एकूण कोरोना बाधितांचा आकडा ९४६ वर पोहचला आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८१ झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ४४ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, १५ रुग्ण कोविड केयर सेंटरमध्ये तर २२ रुग्ण यवतमाळ व इतरत्र उपचार घेत आहेत.

आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये एकता नगर येथील एक, भीमनगर एक, रंगारीपुरा एक, आंबेडकर चौक एक, चिखलगाव एक तर चोपण येथील दोन व्यक्तींचा समावेश आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले