WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शिरपूर पोलिसांनी कोंबड बाजारावर धाड टाकून पाच आरोपीना केली अटक

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

शिरपूर पोलिसांनी कायर बिट अंतर्गत येणाऱ्या पिंपरी येथील जंगलात भरविल्या जाणाऱ्या कोंबड बाजारावर सिनेस्टाईल धाड टाकून पाच आरोपीना अटक केली. सदर कार्यवाही २९ नोव्हेंबरला दुपारच्या सुमारास करण्यात आली. पिंपरी जंगल परिसरात मोठा कोंबड बाजार भरत असल्याच्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी शेतकऱ्यांच्या वेशात गोपनीय पद्धतीने जंगलात शोध घेऊन त्याठिकाणी सुरु असलेल्या कोंबड बाजारावर धाड टाकून लाखो रुपयांच्या मुद्देमालासह पाच आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले. झुंजी लावणाऱ्यांना शेतकऱ्यांच्या वेशात पोलीस आल्याचा संशय आल्याने ते जंगलात सैरावैरा पळत सुटले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून पाच जणांना पकडले तर उर्वरित दहा जण पळून जाण्यात यशस्वी ठरले.

कायर बिट अंतर्गत येणाऱ्या पिंपरी जंगलात कोंबडबाजार भरवून कोंबड्यांच्या झुंजीवर लाखो रुपयांची बाजी लावण्यात येत असल्याची गुप्त माहिती शिरपूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी शेतकऱ्यांच्या वेशभूषेत गोपनीय पद्धतीने जंगलात धाड टाकून कोंबड्याच्या झुंजीवर पैशाची बाजी लावणाऱ्या पाच आरोपीना अटक केली. पोलीस आल्याची चाहूल लागताच उर्वरित दहा आरोपी जंगलाचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी ठरले. पोलिसांनी पाठलाग करून अटक केलेल्या पाच आरोपींमध्ये जीवन राजकुमार काकडे, संदीप वामनराव बंडुरकर, सुभाष लटारी लोंढे, भास्कर मरिबा वाघोसे, मारोती बाबुराव खंडाळकर सर्व रा. पिंपरी (कायर) यांचा समावेश आहे. पोलिसांनी घटना स्थळावरून पाच जिवंत कोंबडे, एक मृत कोंबडा, रोख रक्कम व मोबाईल, नऊ दुचाकी असा एकूण पाच लाख ४४ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पाचही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक ए. के. धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सचिन लुले, पोलीस उपनिरीक्षक धावळे, नापोका अमोल कोवे, अभिजित कोशतवार, पोका निलेश भुसे, संजय खांडेकर, राजू शेंडे यांनी केली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share