WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत महाविकास आघाडीचे तीनही तालुक्यातील उमेदवार विजयी

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकित वणी मारेगाव व झरी या तीनही तालुक्यातून महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय संपादन केल्याने हा राजकिय क्षेत्रातील मोठा बदल मानला जात आहे.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकित महाविकास आघाडीचे जिल्ह्यातून मोठ्या संख्येने उमेदवार विजयी झाल्याने ही राजकारणातील मोठी उलथापालथ मानली जात आहे. वणी विधानसभा क्षेत्रातील तीनही तालुक्यातून महविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळविल्याने ग्रामपंचायत निवडणुकीचे समीकरन बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वणी तालुक्यातून महाविकास आघाडीचे कॉंग्रेसचे उमेदवार टिकाराम कोंगरे विजयी झाले तर मारेगाव तालुक्यातून महविकास आघाडीचेच शिवसेनेचे उमेदवार संजय देरकर विजयी झाले आहेत. तसेच झरी जामनी तालुक्यातूनही महविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार राजू ऐलतिवार विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीने तीनही तालुक्यात विजय संपादन केल्याने राजकिय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून महाविकास आघाडीचे हे मोठे यश मानले जात आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.