WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

फसवणूक झालेल्या पिक विमाधारक शेतकऱ्यांच्या "जवाब दो" आंदोलनात सहभागी व्हा - सुनील कातकडे यांचे आव्हान

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

पिक विमा कंपनीच्या विरोधात खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात होणाऱ्या "जवाब दो " आंदोलनात वणी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आव्हान शिवसेनेचे वणी विधानसभा प्रमुख सुनील कातकडे यांनी केले आहे. सोमवार २८ डिसेंबरला यवतमाळ येथील टिम्बर भवन येथे हे आंदोलन होणार आहे.

शेतकरी आधीच संकटात सापडला असताना पिक विमा कंपन्यांनीही शेतकऱ्यांचा विमा नाकारून त्यांच्यावर एक प्रकारे अन्याय केला आहे. आस्मानी व सुलतानी संकटांना तोंड देत असताना पिक विमा कंपन्यांनीही पिक विमा देण्यास नकार दिल्याने शेतकरी चिंतेत आला आहे. जिल्ह्यातील ४ लक्ष ६७ हजार शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आहे. जिल्ह्यातील इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीकडून काढण्यात आलेल्या विम्या पोटी कंपनीत १६७ कोटी रुपये जमा झाले. परंतु नियमांचा पाढा वाचत विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन, कापूस व अन्य पिकांचा विमा देण्यास नकार दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कंपनीच्या फसव्या निकषानुसार जिल्ह्यातील केवळ ९ हजार ७७६ शेतकरीच विम्यास पात्र ठरल्याने त्यांना फक्त ९ कोटी ३८ लक्ष रुपये विम्याची रक्कम वाटप करण्यात आली. परंतु ४ लक्ष ५७ हजार २४५ शेतकऱ्यांनी विम्यापोटी भरलेले १५८ कोटी रुपये विमा कंपनी नियमांचे निकष पुढे करत हडपण्याचा प्रयत्न करीत आहे. नापिकीने आधीच संकटात आलेल्या शेतकऱ्यांना विम्याचाच आधार असताना विमा कंपनीनेही नियमांच्या निकषावर बोट ठेवत पिक विमा देण्यास नकारात्मक भूमिका घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पिक विमा कंपनी आपल्या नफेखोरीच्या प्रयत्नात शेतकऱ्यांची लुबाडणूक करत असल्याने या कंपनीचा जिल्ह्यातील विमा करार संपुष्ठात आणण्याकरिता तसेच शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याकरिता यवतमाळ येथे खा. भावना गवळी यांच्या नेतृत्वात २८ डिसेंबरला यवतमाळ येथील टिम्बर भवन येथे होणाऱ्या "जवाब दो " आंदोलनात वणी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आव्हान शिवसेना वणी विधानसभा प्रमुख सुनील कातकडे यांनी केले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share