WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मंदर शेत शिवारातील चोरी प्रकरणाचा अवघ्या पाच तासात डीबी पथकाने लावला छडा

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

तालुक्यातील मंदर शेत शिवारातील पोल्ट्री फार्म येथून साहित्य चोरीला गेल्याची घटना २३ डिसेंबरला रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. २४ डिसेंबरला पोल्ट्री फार्म येथे सुपरवाईजर असलेल्या युवकाने चोरी झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला नोंदविली. तक्रार प्राप्त होताच डीबी पथकाने अती शीघ्र तपास करीत अवघ्या पाच तासात चोरीला गेलेल्या संपूर्ण मुद्देमालासह आरोपीला अटक केली. गुन्हेगारी वर्तुळावर बारीक नजर ठेऊन गुन्हेगारांमध्ये पोलिसी वचक निर्माण करण्यात डीबी पथकाची महत्वपूर्ण भूमिका राहिली आहे. प्रकरणाचा अती शीघ्र तपास करून आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्याने गुन्हेगारांनी डीबी पथकाची चांगलीच धास्ती घेतल्याचेही दिसून येत आहे.

शहरापासून काही अंतरावर असलेल्या मंदर शेत शिवारातील पोल्ट्री फार्म मधून साहित्य चोरीला गेल्याची तक्रार त्याठिकाणी सुपरवाईजर असलेल्या विजय नत्थूजी चिकटे (३६) रा. तेली फैल याने २४ डिसेंबरला पोलीस स्टेशनला नोंदविली. मंदा वासुदेव राणे यांच्या मालकीच्या शेतातील पोल्ट्री फार्म मध्ये ठेवलेले दोन लोखंडी कटर, ग्रॅण्डर, ड्रिल मशीन, सिलिंग फॅन, मोटार पंप असे एकूण १३ हजार ६०० रुपयांचे साहित्य चोरटयांनी चोरून नेल्याची तक्रार प्राप्त होताच डीबी पथकाने तपास चक्रे फिरवीत अवघ्या पाच तासांत चोरीच्या प्रकरणाचा छडा लावून आरोपी शेख सलीम शेख इस्माईल यास अटक केली. त्याच्या कडून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्यावर भादंवि च्या कलम ३७९ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदर कार्यवाही डीबी पथक प्रमुख गोपाल जाधव, पोहवा सुदर्शन वानोळे, पोना सुधीर पांडे, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, अमित सोयाम, पोकॉ पंकज उंबरकर, दिपक वान्ड्रूसवार यांनी केली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share