WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

महादेव नगरीतील राहत्या घरी आढळून आला बनावट सुपारी तयार करण्याचा मिनी कारखाना

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

बनावट कीटकनाशकं शेतकऱ्यांना विकणाऱ्या शहरातील बोढे कृषी केंद्रावर धाड पडल्याचे प्रकरण ताजे असतानाच तालुक्यातील चिखलगांव येथील महादेव नगरी येथे वास्तव्यास असलेल्या व्यक्तीच्या निवासस्थानी पोलिसांनी धाड टाकून दोन नामांकित कंपनीच्या नावाने तयार करण्यात आलेला निकृष्ठ दर्जाच्या बनावट सुपारीचा मोठा साठा जप्त केला. तसेच प्रतिबंधित सुगंधित तंबाखू भरलेली पॅकेटेही पोलिसांनी जप्त केली. दिपक कवडु चावला (३५) असे या या बनावट सुपारी तयार करून विकणाऱ्या व्यक्तीचे नाव असून त्याच्या निवासस्थानी बनावट सुपारी तयार करण्याचा मिनी कारखानाच पोलीसांना आढळून आला. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्यावर गुन्हे दाखल केले आहे. आरोपीच्या घरून पोलिसांनी ५ लाख ३४ हजार ७०९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कार्यवाही ७ जानेवारीला ६.३० वाजताच्या दरम्यान करण्यात आली.

नागपूर येथील शांतीनगर येथे वास्तव्यास असलेले जी.बी. गृह उद्योग व्यावसायिक मो.अशपाक फारुख कालीवाला (४२) यांनी (diamond gold GB Dyndya व Venus charminar Gold) त्यांच्या कंपनीचे नाव वापरून बनावट सुपारी तयार करून विक्री करण्यात येत असल्याची तक्रार ७ जानेवारीला पोलीस स्टेशनला नोंदविली. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून चिखलगांव येथील महादेव नगरीमध्ये राहणाऱ्या दिपक कवडू चावला याच्या निवासस्थानी धाड टाकली असता पहिल्या मजल्यावर बनावट सुपारी तयार करण्याचा मिनी कारखानाच पोलिसांना आढळून आला. निकृष्ठ दर्जाची सुपारी सदर कंपनीच्या नावाचे बनावट पॅकिंग तयार करून विक्री करण्याचा गोरखधंदा दिपक चावला याने चालवला होता. हि बाब जी.बी. गृह उद्योजग मो. अशपाक फारुख कानीवाला यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी वणी पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार नोंदविली पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेत त्यांच्यासह चावला यांच्या निवासस्थानी धाड मारली. त्याठिकाणी पोलिसांना एयर कॉम्प्रेसर मशीन व स्टील पॅकिंग मशीनच्या माध्यमातुन निकृष्ठ दर्जाच्या सुपारीचे बनावट पॅकिंग तयार करण्यात येत असल्याचे आढळून आले. मो. अशपाक काणीवाला यांच्या कंपनीचे (Diamond gold GB Dyndya व Venus charminar Gold) ट्रेड मार्क व अन्न व औषध प्रशासनाकडून रीतसर परवानगी असतांनाही चावला याने त्यांच्या नावाचे प्रोडक्ट, पॅकिंग लेबल, ट्रेड मार्क, फूड परवाना वापरून निकृष्ठ दर्जाच्या सुपारीचे बनावट पॅकिंग तयार करून विक्री केल्याने काणीवाला यांचे आर्थिक नुकसान तर झालेच त्यांची फसवणूक देखील झाली आहे. त्यांच्या तक्रारीवरून व अन्न व औषधी प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या तपासणी अहवालावरून पोलिसांनी दिपक चावला याला अटक करून भादंवि च्या कलम ४२०,४८२,४८६,२६९,२७०,२७२,२७३,१८८,३२८ व रजिष्ट्रेशन ऑफ ट्रेड मार्क ऍक्ट १०३,१०४, तसेच अण्णा सुरक्षा कायदा २००६ च्या कलम ५९ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

आरोपीच्या निवासस्थानातून पोलिसांनी स्टील पाऊच पॅकिंग मशीन अ. कि. २ लाख ३६ हजार रुपये, स्पीड एयर कॉम्प्रेसर किंमत ५० हजार रुपये, कंपनीच्या नावाचे पाऊच बनविण्याकरिता लागणारे दोन छापीव रोल बंडल किंमत ३३५० रुपये, ५०० ग्राम सुपारीचे पॅकेट २७५ रुपये, २५ किलो वजनाच्या सुपारीने भरलेल्या १४ नायलॉन थैल्या व १५ किलोची एक थैली किंमत १ लाख ६७ हजार ९०० रुपये, ३७ किलो खुला तंबाखू किंमत ११ हजार १०० रुपये, सुगंधित तंबाखू भरून असलेले ४० ग्राम वजनाचे ४३६ पॅकेट किंमत २३ हजार ५४४ रुपये, सुगंधित तंबाखु भरलेले ४०० ग्राम वजनाचे १० पॅकेट किंमत २१ हजार ६०० रुपये, सुगंधित तंबाखू भरलेले २०० ग्राम वजनाचे चार पॅकेट किंमत १०८० रुपये, जी.बी. बेस्ट क्वालिटी लिहिलेल्या १६ खाली थैल्या किंमत १६० रुपये, ५५५ डायमंड गोल्ड प्रीमियम क्वालिटी २५ किलो लिहिलेल्या ८१ प्लास्टिक थैल्या किंमत ८१० रुपये, ३० किलो क्षतेचा इलेक्ट्रॉनिक वजन काटा किंमत ५ हजार रुपये, एक छोटा इलेक्ट्रॉनिक वजन काटा किंमत १००० रुपये, एक सील मशीन किंमत दोन हजार रुपये, एक छोटी सील मशीन किंमत १२०० रुपये, एक बॅग क्लोझर इलेक्ट्रॉनिक मशीन किंमत ७ हजार रुपये, मजा १०८ लिहिलेले ५० ग्राम वजनाचे ४० खाली बॉक्स, प्रत्येक बॉक्स मध्ये १० नग असे एकूण ४०० नग किंमत १००० रुपये असा एकूण ५ लाख ३४ हजार ७०९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार वैभव जाधव, डीबी पथक प्रमुख गोपाल जाधव, पोहवा सुदर्शन वानोळे, पोना सुधीर पांडे, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, हरिन्द्र भरती, पोकॉ पंकज उंबरकर, दीपक वान्ड्रूसवार यांनी केली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share