WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती दिनी शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त २३ जानेवारीला सकाळी १० ते साय. ५ वाजेपर्यंत स्थानिक सुभाषचंद्र बोस चौक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्रिमूर्ती गणेश मंडळ व स्पोर्टींग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र तसेच विधवा महिलांना साडी वाटप करण्यात येणार आहे. रक्तदात्यांनी दान केलेले रक्त शासकीय जिल्हा ग्रामीण रुग्णालय चंद्रपूर येथील रक्तपेढीत जमा होणार असून तेथीलच टिम शिबिरातील रक्तदानाची प्रक्रिया पार पाडणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून आपल्या दान केलेल्या रक्तामुळे कुणाची रक्ताची गरज भागू शकते, व त्याला जीवनदान मिळू शकते. त्यामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात नागरिकांनी उस्फुर्तपणे सहभाग दर्शवून रक्तदान करण्याचे आव्हान आयोजन समितीचे अध्यक्ष दिगांबर चांदेकर, अजय भटघरे, रक्तदान शिबिराचे संयोजक सुनील भटघरे, न.प. उपाध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आशिष मोहितकर, गणेश सुंकुरवार, श्रीकांत गंगशेट्टीवार, नरेश रामगिरवार, विलास गाणफाडे, जीवन काळे, संदीप नागपुरे, सागर खडसे, सचिन उरकुडे, पवन बोबडे, नाना फटाले, अनंत येसेकर, पंकज भटगरे, राजू बेतवार यांनी केले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.