WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक युवक जागीच ठार तर एक जन गंभीर जख्मी !

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची घटना काल रात्री 11.30 वाजताच्या सुमारास वनी वरोरा रोडवरिल झोला फाट्या जवळ घडली. निळापूर रोडवरिल एका कापसाच्या जीनामध्ये कंप्यूटर ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेला अक्षय प्रेमदास जुमळे (25) रा. जैताई नगर हा युवक परिचयातील व्यक्तीला वरोरा येथे सोडून मित्रासह दुचाकीने वणीला परत येत असताना अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जबर धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवरील त्याचा मित्र अनिरुध्द मेश्राम रा. वाघदरा हा गंभीर जख्मी झाल्याने त्याला उपचाराकरिता नागपूर येथे हलविण्यात आले आहे.

वनी वरोरा रोडचे चौपदरी करनाचे काम सुरू असल्याने एका बाजुने रस्त्याचे खोदकाम केले जात आहे. त्यामूळे रस्ता अरुंद झाल्याने या रस्त्यावरुन रात्रीचा दुचाकीचा प्रवास जिकरीचा झाला आहे. या रस्त्याने पॉवर प्लान्टला कोळसा वाहतूक करणारे ट्रकही मोठ्या प्रमाणात धावत असतात. एका कापसाच्या जिनामध्ये कंप्यूटर ऑपरेटर असलेला अक्षय जुमळे हा आपल्या मीत्रासह परिचयातील व्यक्तीला वरोरा येथे सोडून दुचाकीने वणीला परतत असताना त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी वरील त्याचा मित्र गंभीर जख्मी झाल्याने त्याला नागपूरला रेफर करण्यात आले आहे. मित्राची प्रकृतीही अत्यवस्थ असल्याचे समजते. रात्रीची वेळ असल्याने खुप वेळ पर्यंत दोगेही रस्त्यावरच पडून होते. त्यानंतर पोलिसाना घटनेची माहिती मिळताच पोलिसानी तत्काळ घटना स्थळ गाठुन दोघानाही ग्रामीण रुग्णायात आणले. जख्मीला पुढील उपचारा करिता नागपूरला रेफर करण्यात आले आहे. मृत युवकाची उत्तरीय तपासणी करुन मृतदेह अंतीम संस्काराकरीता कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. युवकाच्या अशा या अकाली जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.