मंगलमपार्क मधिल आर.के. अपार्टमेन्टमध्ये सुरू असलेल्या सट्टयावरील धाड़ीत पोलिसानी जप्त केला 4 लाखांचा मुद्देमाल !
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)
तालुक्यातील चिखलगाव हद्दीत येणाऱ्या मंगलमपार्क मधिल आर.के. अपार्टमेन्टमध्ये सुरू असलेल्या सट्टा मटक्यावर काल 13 डिसेंबरला दुपारी 3 वाजताच्या दरम्यान पोलिसांनी धाड टाकुन 4 लाख 3 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 9 आरोपींना अटक केली आहे. वनी येथील जिल्हा पोलिस पथकाच्या क्रिकेट सट्टयावरील धाड़ी नंतर पोलिस यंत्रना सतर्क झाली असून छुप्या पद्धतीने शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांची माहिती गोळा करण्याचे काम पोलिसांनी युद्ध पातळीवर सुरू केले आहे.
पोलिस निरिक्षक वैभव जाधव यांना मंगलमपार्क मधिल आर.के. अपार्टमेन्टमध्ये सट्टा मटका खेळला जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीच्या आधारे त्यानी एसडीपीओ यांच्या मार्गदर्शनात डिबी पथकाला सोबत घेऊन आर.के. अपार्टमेन्ट मधिल फ्लैट मध्ये सुरू असलेल्या सट्टा मटक्यावर धाड टाकली. पोलिसांनी सट्टा मटका खेळणाऱ्या नऊ जनांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सट्टा मटका खेळण्याकरिता वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले. घटना स्थळावरून पोलिसांनी विविध कंपन्यांचे 20 मोबाईल हँडसेट, कलर प्रिंटर 2, लेझर प्रिंटर 1, दुचाकी 3, काल्क्यूलेटर 8, सिलिंग फैन 2 व इतर साहित्य असा एकुण 4 लाख 3 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून महेश रमेश मोहबिया (31), सुमीत चतुर्दास झाडे (24), कार्तिक विट्ठल मंच्चेवार (25), आकाश रामदास चौधरी (26) सर्व रा. शास्त्रीनगर, कुणाल विट्ठल बुर्रेवार (26) रा. रामपुरा वार्ड, सचिन विनोद धनकसार (20) रा. रंगारीपुरा, अमीर अशपाक पठाण (23) रा. रंगारीपुरा, राहुल उल्हासराव वर्हाटे (35) रा. मच्छीमार्केट, निलेश दिलीप झाडे (25) रा. तेलीफैल या नऊ आरोपींना अटक केली आहे. सदर मटका मंगल विट्ठल खाडे याचा असल्याचे पोलिस तपासत निष्पन्न झाल्याने त्यालाही अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्यावर भरपुर गुन्हे दाखल झाल्याने त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार करुन मंजुरी करिता उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कडे पाठविण्यात आला आहे. आरोपीवर भादंवी च्या कलम 420,465,468,471,269,188 व महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या 4,5 नुसार गुन्हा दाखल केला आहे. जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याकरिता पोलिस अधिक्षकांनी सुरू केलेले धाडसत्र शहर पोलिसानीही यशस्वीपणे राबविण्याचा निर्धार केला असून काही दिवसांतच छुप्या मार्गाने सुरू असलेल्या सट्टा मटक्यावर धाड टाकुन पोलिस अधिक्षकांना शहर पोलिस प्रशासनही सतर्क असल्याचे एक प्रकारचे उदाहरण दिले आहे. शहरात छुप्या मार्गाने सुरू असलेले अवैध धंदे शोधून काढत त्यांना पुर्णपणे बंद करण्याचे आव्हान पोलिसानी स्विकारले असल्याचे या धडक कार्यवाही वरुन स्पष्ट झाले आहे.
सदर कार्यवाही उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार वैभव जाधव, डिबी पथक प्रमुख गोपाल जाधव, सुदर्शन वानोळे, सुधिर पांडे, सुनिल खंडागळे, पंकज उंबरकर, अमित पोयाम, रत्नपाल मोहाडे,दिपक वांडृसवार, रवी ईसनकर, ईकबाल शेख़ यांनी केली.