WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले धरणे आंदोलन

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

नगर पालिकेच्या पाणीकर वसुलीतील रक्कमेत झालेल्या लाखो रुपयांच्या अपहार प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याच्या मागणीसह अन्य मागण्यांना घेऊन शिवसेनेच्या वतीने आज उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे व पदाधिकाऱ्यांनी मागण्यांच्या पूर्ततेकरिता आज २१ जानेवारीला तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

नगर पालिकेच्या पाणीकर वसुलीतील रक्कमेत १७ लाख ३४ हजार रुपयांची अफरातफर करण्यात आली. एप्रिल 2019 ते ऑक्टोंबर 2020 या काळात एकुण 71 लाख 33 हजार 110 रुपयांची पाणी कर वसुली करण्यात आली. त्यात 17 लाख 34 हजार 758 रुपयांची तफावत आढळून आली. या प्रकरणी ३ ऑक्टोबरला पोलीस स्टेशनला तक्रारही नोंदविण्यात आली. या अफरातफरी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, शिंदोला येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यात यावे, शहरात वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली असून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याकडे लक्ष द्यावे, फिरत्या पाणी विक्रीच्या गाड्यांवर लावण्यात आलेले ध्वनीक्षेपण अद्यापही काढण्यात आले नसून त्यातून वाजणाऱ्या कर्णकर्कश गाण्यांमुळे ध्वनी प्रदूषणात वाढ होण्याबरोबरच नागरिकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने पाणी विक्रीच्या गाड्यांवरील लाऊंड्सस्पिकर वाजविण्यावर बंदी आणावी, तसेच मुकुटबन फाटा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते वरोरा रेल्वे क्रॉसिंग पर्यंतच्या रोडचे दोन वर्षांपूर्वी ४ कोटी ८५ लाख रुपये खर्चून करण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्यात यावी. या प्रमुख मागण्यांना घेऊन आज शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share