WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

सुकणेगाव येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

शाळेची फी भरण्याकरिता घराबाहेर पडलेली अल्पवयीन मुलगी दोन दिवस लोटूनही घरी परतली नाही. त्यामुळे मुलीला कुणी तरी फूस लावून पळवून नेल्याचा संशय आल्याने मुलीच्या वडिलांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली आहे. तालुक्यातील सुकणेगाव येथील अल्पवयीन शाळाकरी मुलगी २२ जानेवारीला घरून शाळेत फी भरण्याकरिता घराबाहेर पडली ती घरी परतलीच नाही. दोन दिवस नातेवाईक व मैत्रिणींकडे शोधाशोध घेऊनही मुलीचा पत्ता न लागल्याने अखेर मुलीच्या वडिलांनी मुलीला कुणी तरी पळवून नेल्याचा संशय व्यक्त करीत पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्ती विरुद्ध तक्रार नोंदविली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून शोधकार्य सुरु केले आहे.

सुकणेगाव येथील अल्पवयीन विद्यार्थिनी शाळेत फी भरण्याचे कारण सांगून घराबाहेर पडली. २२ जानेवारीला घरून ५०० रुपये घेऊन फी भरण्याकरिता गेलेली मुलगी दोन दिवस होऊनही घरी न परतल्याने तिचा सर्वत्र शोधाशोध घेण्यात आला. सर्वच परिचितांकडे शोधूनही तिचा थांगपत्ता न लागल्याने तिला कुणी तरी फूस लावून पळवून नेल्याचा वडिलांना संशय आला. वडीलानी २५ जानेवारीला वणी पोलीस स्टेशनमध्ये मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवितांनाच तिला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला. पोलिसांनी वडिलांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध भादंवि च्या कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील विद्यालयांमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या गाव खेड्यातील तरुणींना भूलथापा देऊन प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे शैक्षणिक जीवन उध्वस्त केल्या जात आहे. काही टारगट तरुण विद्यालयीन तरुणींचा पिच्छा पुरवून त्यांना स्वतःकडे आकर्षित करून आमिषे प्रलोभने देऊन त्यांना मोहजाळात अडकावीत आहेत. शाळाकरी तरुणी त्यांच्या आकर्षणाला व आमिषाला बळी पडून आपल्या आयुष्याची धूळधाण करून घेत आहेत. त्यांच्या फसव्या शब्दांना प्रेम समजून काही तरुणी कोणताही विचार न करता या रोडरोमियोंबरोबर पळून जाण्यासही तयार होत असल्याने कुटुंबियांवर नामुष्की ओढवली जात आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share