WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

सत्तावीस वर्षीय विवाहित महिलेवर शहरातील कृषीकेंद्र चालकाने केला अत्याचार, पतीच्या परिचयातीलच व्यक्तीने केला घात !

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

एका २७ वर्षीय विवाहित महिलेवर तिच्या पतीच्या ओळखीतील एका कृषीकेंद्र चालकाने ओळखीचा फायदा घेत लैंगिक अत्याचार केल्याची घटना ५ फेब्रुवारीला उघडकीस आली. महिलेने वारंवार शरीर सुखाची मागणी करत बळजबरी करणाऱ्या कृषीकेंद्र चालकाविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी कृषीकेंद्र चालकाविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. मूळचा बोपापूर येथील रहिवासी असलेल्या संदिप पिंपळकर (३५) याचे शहरातील विराणी फंक्शन हॉल समोर कृषीकेंद्र असून तो हल्ली शहरातच वास्तव्याला आहे. महिलेचा मुलगाही शहरातच त्याच्या आजीकडे शिकायला असल्याने तिचे शहरात येणे जाणे असायचे. संदिप पिंपळकर व महिलेच्या पतीची चांगली ओळख असल्याने तो महिलेच्याही परिचयाचा होता. महिला मुलाला भेटण्याकरिता शहरात येत असल्याची माहिती असल्याने त्याने महिलेला फोन करून एका ठिकणी भेटण्यास बोलावले. महिला त्याठिकाणी आली असता त्याने तिला मुलाला जीवे मारण्याची धमकी देत दुचाकीवर बसण्यास सांगीतले. तिला वरोरा येथील लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर तो तिला मुलाच्या जीवितास धोका पोहचविण्याची धमकी देऊन वारंवार तिचे शारीरिक शोषण करू लागला. त्याच्या या बळजबरी शारीरिक संबंध ठेवण्यामुळे त्रस्त झालेल्या महिलेने हा सगळा प्रकार आपल्या पतीला सांगत अत्याचारी कृषीकेंद्र चालकाविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली.

बोपापूर येथील रहिवासी असलेल्या व सध्या शहरातील भोंगळे ले-आऊट येथे रहात असलेल्या कृषीकेंद्र चालकाने तेथीलच एका विवाहित महिलेशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची तक्रार महिलेने पोलीस स्टेशनला नोंदविली आहे. महिलेच्या पतीशी असलेल्या ओळखीचा फायदा घेत तिला फोन करून भेटायला बोलावून संदीप पिंपळकर याने तिच्या मुलाच्या जीवितास धोका पोहचविण्याची धमकी देऊन तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मुलाला मारण्याची धमकी दिल्याने ती त्याच्या दुचाकीवर बसून वरोरा येथील लॉजवर गेली. त्याठिकाणी त्याने त्या महिलेशी जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित करून आपली वासना भागविली. त्यानंतर नेहमी तो मुलाला जीवे मारण्याची धमकी देत वारंवार तिच्यावर बलात्कार करू लागला. त्याच्या या सततच्या बळजबरीमुळे त्रस्त झालेल्या महिलेने सदर प्रकार आपल्या पतीला सांगत संदिप पिंपळकर याच्याविरुद्ध लैगिक अत्याचार केल्याची तक्रार पोलीस स्टेशनला नोंदविली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत कृषीकेंद्र चालक संदिप सुधाकर पिंपळकर (३५) यास अटक करून त्याच्या विरुद्ध भादंवि च्या कलम ३७६(२)N, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी त्याला न्यायालयात हजार केले असता न्यायाधीशांनी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

पुढील तपास पोलीस निरिक्षक वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात एपीआय माया चाटसे करीत आहे

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share