WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तालुक्यात आज सात व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल आले पॉझिटिव्ह !

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

तालुक्यात कोरोना संक्रमणाची गती वाढत असून प्रतिदिन मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचा कहर वाढू लागला आहे. कोरोनाने परत उग्ररूप धारण केल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने प्रशासनाची चिंता वाढली असून नागरिकही चिंतेत आले आहे. सातत्याने कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. रुग्णसंख्या वाढीचा वेगही चांगलाच वाढला आहे. कोरोना संदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन होत नसल्याने कोरोनाची परिस्थिती गंभीर होतांना दिसत आहे. तालुक्यात आज सात व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२७५ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण २९ झाले आहेत. आज आणखी ७ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत १२२१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

आज १३१ तपासणी अहवाल प्राप्त झाले असून त्यात सात व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. त्याचप्रमाणे आज ३७ व्यक्तींची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली असून त्यांचे सर्वच रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज आणखी ७० नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने १६७ नमुन्यांचे अहवाल अप्राप्त आहेत. आता पर्यंत ५१५४ व्यक्तींची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली असून ६२९९ व्यक्तींच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या आहेत. २९ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी २० रुग्ण कोविड केयर सेंटरला, १ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर ८ रुग्ण यवतमाळ इतरत्र उपचार घेत आहेत.

आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये रविनगर येथील एक, भगतसिंग चौक एक, भीमनगर एक, जैनस्थानका जवळ एक, राजूर कॉलरी एक, सोनापूर एक तर मारेगांव तालुक्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले असून नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share