WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तीच्यासाठी कडक उन्हामध्ये त्यांनी केला ५१ किलोमीटर चा प्रवास

Image

मुकूटबन- आपल्या रक्तदानामुळे जीव वाचत असेल तर नक्कीच आपन कोणासाठी तरी जिवनदाता आहो. व्हाट्सएप द्वारे रक्तदाते उपलब्ध करून देताना राजीव गांधी सरकारी रूग्णालय आदीलाबाद येथे भरती असलेल्या गरोधर महीला प्रिया महेंद्र आगरकर यांचेकरीता रक्ताची गरज आहे अशी केस येताच रक्तविर बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र यांनी तात्काळ रक्तदाता उपलब्ध करून दिला. सोशल मिडीया च्या युगामध्ये व उन्हाच्या चटक्याने कुलर ए.सी. च्या थंड हवेत आराम करणारे युवक आज दिसतात. परंतु मुकूटबन येथील प्रियल पथाडे व राजुर येथील धम्मा भोवरे या दोघांनी मिञाला दुचाकी मागुन दुपारच्या उन्हाचे चटके झेलीत ५१ किलोमिटरचा प्रवास करून थेट आदीलाबादचे सरकारी रूग्णालय गाठले. ब्लड बँकेत जाऊन प्रियलने रक्तदान केले व गरोधर महिला प्रिया महेंद्र आगरकर यांची भेट घेतली. अनेक गरजु गरीब रूग्णाला रक्तदाते देताना आज स्वता रक्तदाता बनुन समाजात त्याने उल्लेखनीय कार्य केले. अशाच रक्तदान क्षेञात उल्लेखनिय कार्य केल्यामुळे अमरावती रक्तदाता संघटन, एड. वैशाली डोळस, सोच ब्लड गृप इंदौर (मध्य प्रदेश), यांचेहस्ते पुरस्कृत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share