WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न

Image

वणी:- गव्हर्नमेंट हायस्कूल वणी या विद्यालयात सन २०१०-२०११ या वर्षात एस.एस.सी.ला असणार्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा दि.०४-०२-२०२४ रोजी शाळेत संपन्न झाला.कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन त्या बॅच चे माजी विद्यार्थी प्रतिक कोवे व आकाश नरांजे यांनी केले. स्नेहमेळाव्यात माजी विद्यार्थी प्रविण जुमनाके,निकेश लांडे, आकाश खंडाळकर,आकाश मानकर,मुकेश सोनटक्के,प्रणव चोरे, प्रशांत राऊत, अमर इंगोले, शुभम इंगोले..माजी विद्यार्थिनी ममता डुमरे, वैशाली येसांबरे, प्रियंका गिरटकर,प्रीती मुंजेकर, दिपा घोसे, जयश्री पोटे, श्रद्धा सिडाम, माधुरी गोलर, सुरेखा दोरखंडे,हे सर्व उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ व सेवानिवृत्त शिक्षक श्री खडसे सर होते तर प्रमुख उपस्थितीत सेवानिवृत्त शिक्षक श्री पाझारे सर, श्री जीवतोडे सर,सौ.बनसोड मॅडम , श्री.मुंजेकर सर, श्री.राजुरकर सर.श्री.घावडे सर, श्री.कांबळे सर,तथा शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक मुजफ्फर आली खान व श्री.निखाडे सर होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वांनी आपला परिचय दिला व स्मृतिंना उजाळा दिला.सर्व मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.सर्व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.भविष्यकालीन आव्हाने व युवकांची भुमिका विषद केली.तत्कालीन शाळेतील वातावरण व विद्यार्थी याबद्दल आपले विचार व्यक्त केले.

आमच्या सौ बनसोड मॅडम यांंनी भाषणाचे शेवटी जगदगुरु श्री वामनराव पै यांनी लिहिलेली विश्व प्रार्थना सामुहिक म्हणून घेतली तेव्हा वातावरण मंगलमय झाले हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धि दे आरोग्य दे

सर्वाना आनंदात सुखात ऐश्वर्यात ठेव..

सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर..

आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे..

आभारप्रदर्शन आकाश नरांजे यांनी केले संचालन प्रतिक कोवे यांनी केले.अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली!!

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले