WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

करंजी रोड येथील महादेव कोहरे गुराखी ह्याचे घर आगीत भस्मसात !

Image

ग्राहक प्रहार संघटना व प्रहार जनशक्ती पक्ष ह्यांनी घेतला मदती साठी पुढाकार! तहसीलदार सुरेश कव्हळे ह्यांना घरकुल साठी दिले आश्वासन !

आज दिनांक 5 मे रोजी सकाळी करंजी येथे ग्राहक प्रहार संघटने चे जिल्हा सचिव प्रसाद नावलेकर व विलास पवार प्रहार जिल्हा अध्यक्ष जनशक्ती पक्ष ह्यांनी पुढाकार घेतल्याने केळापूर येथील तहसीलदार सुरेश कव्हळे ह्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता महादेव कोहरे ह्यांचे घर तीन दिवसांपूर्वी लागलेल्या आगीत भस्मसात झालेले आठळले त्यामुळे महादेव कोहरे ह्यांना ऐक महिन्याचा किराणा व कपडे लत्ये घेण्यासाठी केली आर्थिक मदत सुरेश कव्हळे ह्यांचे हस्ते देण्यात आली! आज दिनांक 5मे रोजी करंजी येथे जाऊन विलास पवार जिल्हा अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष व ग्राहक प्रहारचे जिल्हा सचिव प्रसाद नावलेकर ह्यानी पुठ्ठाकार घेऊन केळापूर येथील तहसीलदार सुरेश कव्हळे ह्यांच्या हस्ते आर्थिक मदत दिली व महिन्या भराचा किराणा दुकानातून आणून दिला तसेच घरकुल मिळवून देऊ जळलेले रेशनकार्ड नवीन बनवून देऊ असे आश्वासन तहसीदार सुरेश कव्हळे ह्यांनी दिले ह्या वेळेस महादेव व इमलाबाई कोहरे दाम्पत्य हजर होते .ग्राहक प्रहारचे सर्व सदस्यांनी व प्रहार जनशक्ती पक्षनेते विलासभाऊ पवार ह्यांनी आर्थिक मदत केली ह्यात तहसीलदार साहेबांनी आपले आर्थिक योगदान दिले .ह्या प्रसंगी डॉ राजेन्द्र आत्राम जिल्हा अध्यक्ष ग्राहक प्रहार संघटना दामोधर बाजोरीया जिल्हा कार्यध्यक्ष,भैय्यासाहेब ठमके,यशवंत काळे ,जयवंत बावणे,नीरज गुरनुले ,निलेश वाभीटकर,विनोदसेठ चमेडिया, अजय दुंमनवार,प्रदीप भानारकर,दिलीप वाढई तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे मोहन मॅनेवार सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .स्थानिक करकर्ते दुर्वास कन्हेरवार ह्यांनी सर्वांचे आभार मानले ह्या प्रसंगी स्थानिक प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share