WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

पट्टा प्रक्रियेतील घरकुल अजूनही प्रतीक्षेत...

Image

घरकुल मंजूर होऊनसुद्धा करावी लागत आहे हक्काच्या घराची प्रतिक्षाच....

सुरज चाटे - वणी नगर परिषद तर्फे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत विविध भागांतील नागरिकांना आवास योजनेचा फायदा होणार असल्याचे आश्वासन मोठ्या प्रमाणात देण्यात आले होते. काहींना धनादेशाचे वितरण करण्यात आले होते मात्र आता ज्यांच्या कडे हक्काचे पट्टे नाही अशा लाभार्थ्यांना उडवा उडवीचे उत्तर मिळत असल्याचे दिसून येत असून संबंधित अधिकाऱ्याचे व लोकप्रतिनिधींचे सुद्धा याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे, त्यामुळे करोडो रुपये निधी मंजूर होऊन सुद्धा लाभार्थी अजूनतरी आपल्या हक्काच्या घरातील घरकुलच्या स्वप्नापासून वंचितच दिसून येत आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी वणी येथे मंत्री महोदय तसेच लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थित भव्य दिव्य कार्यक्रम घेण्यात आला होता. हक्काचे घर मिळणार म्हटल्याने गोरगरीब जनतेनी त्या कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद देत संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करीत आता आपल्याला पट्टा मिळणार याच्या नादात कालावधी लोटत असून अजून पर्यंत हक्काचे घरकुल मंजूर होऊन सुद्धा हक्काचा पट्टा न मिळाल्याने घरकुलचे स्वप्न अपुरेच दिसून येत आहे, संबंधित विभागाला विचारणा केली असता तुम्ही मुख्याधिकारी साहेबांशी बोला, तसेच मुख्याधिकारी साहेबाना विचारणा केली असता आम्ही संपूर्ण पणे तयार आहो परंतु भूमी अभिलेख मध्ये कर्मचारी अपुरे असल्याने काम पूर्णत्वास जात नसल्याचे उत्तर मिळत असून, यास नेमके जबाबदार कोण? असा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे.

करोडो रुपये निधी मंजूर होऊन अधिकाऱ्यांच्या व राजकीय नेत्यांच्या मनमर्जी धोरणाने जर तो कामी नसेल येत तर अशांवर कारवाईची गरज निर्माण झाली असून यात गोर गरीब जनतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. आपल्या हक्काच्या घराकरिता नगर परिषद ते घर अशा चकरा मारू मारू शेवटी त्यांनी सुद्धा सरकारची योजना पूर्णत्वास जाणार की नाही ? असा प्रश्न उपस्थित केला असून त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी याकळे तातडीने लक्ष देऊन अपुऱ्या कर्मचाऱ्यांना पूर्ण करीत काम चालू करण्याची गरज निर्माण झाली आहे.

नेमकं काम कुठं थांबतय?....

पट्टा प्रक्रियेतील घरकुल योजना आता सर्वसामान्यांच्या चांगल्याच डोक्यात जोरधरत असून हक्काचे घर मिळणार तर केव्हा मग यासाठी सर्व प्रकारची पूर्तता करून सुद्धा नेमकं काम कुठं अडलय असा सवाल लाभार्थ्यांना पडला असून तातडीने काम सुरू होण्याची मागणी जोर धरत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share