WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

प्रहार जनशक्ती पक्षनेत्यांनी आमदार कडू ह्यांचा वाढदिवस निराधार स्त्रीला मदत करून साजरा केला !

Image

वणी येथील प्रहार जनशक्ती पक्षनेते प्रशांत खैरे ह्यांचे नेतृत्वात 5जुलै ला आमदार बच्चूभाऊ कडू ह्यांचा वाढदिवस नेत्याचा वाढदस हा पोस्टर प्लेक्स लावून साजरा करण्याची पद्धत आता सर्वत्र पहायला मिळते ,पण डॉ प्रशांत खैरे ह्यांनी उकणी येथील शुभांगी ऐसेकार ह्या विधवा दोन मुलाच्या आईला महिन्या भराचा किराणा देण्यात आला .विशेष म्हणजे दोन महिन्या पूर्वी तिच्या पतीचा अचानक मृत्यू झाला शासना तर्फे कोणतीही मदत मिळाली नाही दोन महिन्या पासून पटवारी सुट्टीवर आहे त्यामुळे ह्या महिलेला कोणतेही कागदपत्र तयार करता आले नाही,हया बाबत तहसीलदार धनमने ह्यानी डॉ खैरे ह्यांना उडवा उडावीची उत्तरे दिल्याने शंभरच्या वर कार्यकर्ते संतप्त झाले होते ह्या बाबत त्यांनी प्रसाद नावलेकर जिल्हा सचिव ग्राहक प्रहार संघटना ह्यांचे कडे केली असता त्यांनी तहसीलदार ह्यांना जाब विचारला असता समाधानकारक उत्तरे न दिल्याने आमदार बच्चूभाऊ कडू ह्यांना वरील प्रकार सांगण्यात आला असुन लवकरच ते वणी येणार आहे.

त्या निराधार महिलेला धान्य देण्यात आले त्या प्रसंगी डॉ प्रशांत खैरे तालुका प्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष वणी,नितीन गोरे,जवाहर अरोरा,पवन काळे, शालुताई ठेंगले, सुधा शेवटकर,प्रेरणा काळे, मेघा नागपुरे, करुणा पारशी, वैशाली मांढरे,मंजुषा पारशिवें, छाया पारशिवें शोभा शिवरकार, सविता पारशिवें, गंगू भरसगर,गयाबाई नागपुरे, सरिता चव्हाण,संगीता इंगोले आदी अनेक होते

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share