WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

निष्ठावंत कार्यकर्त्यांची भाजपमध्ये कुचंबणा ? धनशक्तीपुढे अनुभवाचा पराभव ?

ImageImage

सागर मुने वणी :- विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. विविध पक्षांकडून अनेक नावं समोर येत आहे. सध्या वणी विधानसभेत भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार हे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे ही जागा भाजपकडे जाईल असा अंदाज बांधला जातोय. 2019 ची विधानसभा निवडणूक असल्याने भाजपतर्फे अनेक इच्छुकांचे नाव समोर येत आहे. मात्र यात जुन्या जाणत्या, निष्ठावंत आणि अनुभवी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना डावलले आहे. यात प्रामुख्याने पक्षाचे जुने व निष्ठावंत कार्यकर्ते रवि बेलूरकर यांना डावलण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप सोशल मीडिया मधून होत आहे. त्यामुळे हा सध्या परिसरात चर्चेचा विषय होत आहे.

रवि बेलूरकर हे गेल्या वीस वर्षांपासून भाजपशी जुळले असून पक्ष बांधणी चे काम उत्तम केले आहेत. विद्यार्थी चळवळीतून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली. एक तळागाळातील कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. जेव्हा बीजेपी हा पक्षा परिसरात नावालाही नव्हता, तेव्हा पासून इमाने इतबारे काम करणारा शांत, प्रेमळ, जनतेचे प्रश्न सोडवणारा खरा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे.

नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी नगराध्यक्ष पदासाठी एक ज्येष्ठ आणि पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांनाच उमेदवारी मिळणार अशी दाट शक्यता निर्माण झाल्यानंतरही अखेरच्या क्षणी त्यांचे तिकीट कापण्यात आले. त्यावेळी एका प्रामाणिक कार्यकर्त्याला डावलण्यात आल्याने हळहळही व्यक्त करण्यात आली होती.

वणी विधानसभा क्षेत्र हे पारंपरिक पद्धतीमुळे सेनेकडे होते. त्यामुळे बीजेपीमध्ये जाण्यास तेव्हा कुणी धजावत नव्हते. विधानसभेवर सेनेचा दावा असल्याने भाजपकडे संघटनात्मकदृष्ट्या लोकांचा कलही कमीच होता. त्या काळातही रवि बेलूरकर यांनी भाजपची धुरा सांभाळली आणि छोटेमोठे आंदोलन, निवेदन याद्वारे भाजपचे कार्य पुढे चालवले व पक्षाला परिसरात जिवंत ठेवले. इतकचं काय तर रवि बेलूरकर म्हणजे भाजप असं एक समिकरणं बनलं होतं.

2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे बीजेपीला अच्छे दिन आले. त्यांच्या लाटेेत अनेक हौसे गौसे नवश्यांनी धनशक्तीच्या जोरावर हात धुवून घेतले. त्यांचा कोणताही राजकीय नावलौकिक नव्हता ते लोकप्रतिनिधी झाले. ज्यांनी कधी लोकांच्या प्रश्नावर ' ब्र ' देखील काढला नाही ते नेते म्हणून ओळखले जाऊ लागते. यात जे आधीपासून कार्य करणारे सच्चे कार्यकर्ते होते ते डावलले गेले.

सध्या विधानसभा निवडणूकीचे वारे सुरू झाले आहेत. अनेक नाव समोर येत आहे. अशा वेळी जेव्हा पक्षा कुठेही नव्हता तेव्हापासून कोणत्याही फळाची अपेक्षा न बाळगता जे इमाने इतबारे कार्य करीत आहे अशा खऱ्या, निष्ठावान कार्यकर्त्यांना तिकीट मिळावं. अशी आशा सोशल मीडियातून व्यक्त केली जात आहे. गेल्या वेळी अपेक्षा असूनही रवि बेलूरकर यांची नगराध्यक्ष पदासाठीची संधी सुटली. मात्र यावेळी ही सुटायला नको असे मत सोशल मीडियातून व्यक्त केली जात आहे.

धनशक्तीच्या जोरावर यावेळीही प्रामाणिक, निष्ठावंत कार्यकर्त्याचे तिकीट कापून त्यांना डावलले जाईल का? यावेळी निष्ठेचा विजय होईल की धनशक्तीचा? असे प्रश्न उपस्थित होत असून भाजपचा उमेदवार कोण ? याची उत्सुकता लागली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share