WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

ब्रिज ऑफ होप, संस्थेतर्फे शालेय पुस्तकांचे वाटप

Image

वणी ता.प्र :- ब्रीज ऑफ होप वणी या संस्थे कडुन अत्यंत गोर गरीब व गरजू विध्यार्थींना मोफत शिकवणी, शाळेतील अभ्यास पूर्ण करून घेणं,एक वेळचं जेवण, तसेच स्त्रीयांसाठी शिवणकला, स्वयंम रोजगार या प्रकारे योजनांची माही या वेळेस देण्यात आली.तसेच या संस्थेमार्फत शालेय विद्यार्थ्यांना बुक वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख डाँ. प्रशांत खैरे होते.या प्रसंगी संस्थेतील कॉर्डिनेटर अरुण तिमोथी बल्लमवार, पास्टर के के कुलकर्णी,गंगा मंगलपवार, फराह शेख ,सुनीता पॉल,अर्चना तरारे आदी कर्मचारी वर्ग कार्यरत होते .

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share