WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ यांचे विद्यार्थ्यांचे पेपर तपासणी कडे दुर्लक्ष ...

Image

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ यांचे विद्यार्थ्यांचे पेपर तपासणी कडे दुर्लक्ष आणि निष्काळजीपणा मुळे विद्यार्थ्यांचे नुकसान

प्रतिनिधी, रोहन आदेवार वणी : यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनि प्राचार्यांना दिले निवेदन.

लोकमान्य टिळक महाविद्यालय हे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती मध्ये येतात. दि. 27 एप्रिल ते 15 मे या दरम्यान वाणिज्य तृतीय वर्षाची परीक्षा घेण्यात आली. व 45 दिवसात विद्यापीठाच्या नियमानुसार निकाल लागण्यात येतो परंतु हा निकाल 25 जुलै ला लागला म्हणजे हा निकाल 45 दिवसावरून 70 दिवसावर गेला. व या निकालामध्ये महाविद्यालयातील 53 विद्यार्थी नापास झाले व जवळपास तीस विद्यार्थ्यांना 00 मार्क्स मिळाले. या मध्ये 70% टक्के मार्क मिळणारे विद्यार्थी नापास झाले. विद्यार्थ्यांनि थेट संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठावर थेट असा आरोप केला की विद्यापीठाच्या हलगर्जीपणा मूळे आम्ही नापास झालो. त्यामळे आमच्या इंग्रजी विषयाच्या पेपर चे मूल्यांकन पुन्हा अमरावती विद्यापीठाने करावे व 10 दिवसाच्या आत मध्ये निकाल लावावा कारण पुढील शिक्षणासाठी प्रवेश लवकरच बंद होणार आहे. जर हा निकाल एक महिन्यानंतर लागला तर विद्यार्थ्यांचे एक वर्षाचे शैक्षणिक नुकसान होईल अशी मागणी विद्यार्थ्यांनि निवेदनातून प्राचार्यांना केली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share