WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणीत छायाचित्र व चित्रकला प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद ......

Image

वणी ब्लॅक डायमंड सिटी फोटोग्राफर असोसिएशन व जैताई देवस्थान च्या वतीने जागतिक छायाचित्र दीना निमित्त 19 ऑगस्ट ला छायाचित्र व चित्रकला स्पर्धा तसेच प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे अध्यक्ष देवस्थान चे सचिव माधवराव सरपटवार, उदघाटक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र नगरवाला प्रमुख पाहुणे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, प्रेस वेल्फेअर चे अध्यक्ष गजानन कासावर भाजपचे शहर अध्यक्ष रवी बेलूरकर, नगरसेवक विजय मेश्राम उपस्थित होते. छायाचित्र व चित्रकला प्रदर्शन उत्कृष्ट असून यातील कला ही पाहण्यासारखी होती व हीच प्रदर्शनी पुन्हा नवरात्री उत्सवात भरविण्यात यावी असे मत अध्यक्ष भाषणात माधवराव सरपटवार यांनी केले. छायाचित्र स्पर्धेत प्रथम क्रमांक संजय कालर, द्वितीय क्रमांक स्वरा स्टुडिओ सुनील कोन्ग्रे, तृतीय क्रमांक श्रेयस स्टुडिओ राजू झाडे, प्रॉत्साहनपर बक्षीस ज्योती स्टुडिओ व विनोद चिकाटे यांना मिळाले. चित्रकला स्पर्धेत अमरावती येथे मॉडर्न आर्ट महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या राकेश मांडवकर याचा प्रथम क्रमांक, मॅकरून स्कूल येथे 7 वी ला शिकणारा सनप्रित दानव चा द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक शहेनाज शेख , लायन्स शाळेची चांदणी चव्हाण व स्वर्णलीला शाळेचा स्मित राऊत यांना प्रॉत्साहन पर बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षक नागपूरचे श्रीकांत देऊळकर, अशोक सोनकुसरे, संतोष म्हसे यांनी केले. राजदीप कलर डिजिटल फोटो लॅब, आशिष व्हिडीओ व्हिजन चे विशेष सहकार्य लाभले . कार्यक्रमाचे संचालन सागर मुने यांनी केले असून असोसिएशनचे सचिव प्रवीण भगत, जयंत ताजने, विशाल डाहूले, राजू झाडे, मयूर गेडाम,मनोज सिडाम, प्रविण काकडे, प्रणय मुने यांनी परिश्रम घेतले

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share