WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

संगणक परिचालकांचे काम बंद आंदोलन .....

Image

सागर मुने,वणी

राज्यातील परिचालकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सर्व संगणक परिचालक दि.19 आँगष्ट्पासुन बेमुदत कामबंद आंदोलनावर जात अाहेत.याचाच एक भाग म्हणुन वणी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मधिल संगणक परिचालक यांनी तहसिलदार वणी तसेच बिडीओ पं.स.वणी यांचे मार्फत राज्याचे मुख्यमंञी देवेन्द्र फडनविस यांना दि.22 आँगष्ट्ला काम बंद करुन निवेदन देण्यात आले आहेत.

महाराष्ट् शासनाच्या ग्रामविकास व माहिती तंञद्ण्यान विभागाच्या माध्यमातुन सन 2011 पासुन संग्राम (संगणीक्रुत ग्रामिण महाराष्ट्) व आपले सरकार सेवा केन्द्र या प्रकल्पात राज्यातील सर्व ग्रामपंचायती,पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर संगनक परिचालक म्हणुन हजारो संगणक परिचालक डिजीटल महाराष्टा्चे काम करत आहेत.हे काम करत असतांना राज्यातील ग्रामिण भागातील जनतेला रहिवाशी,बांधकाम परवाना,पीटी आर नक्कल,यासह 29 प्रकारचे दाखले,ग्रामपंचायत मधिल संपुर्ण जमा खर्चाची नोंद घेणे,ग्रामसभा,मासिक सभा,यांचे आनलाईन कामकाज,14 वा वित्त आयोगाचे गावविकास आराखडे यासह ग्रामपंचायत सांगेल ते काम संगणक परिचालक करत आहे.त्यात मागील शेतकरी कर्जमाफी अस्मिता योजना,जनगणना,प्रधानमंञी आवास योजने अंतर्गत लाखो कुटुंबाचा घरकुलाचा सर्वे,प्रधानमंञी पिकविमा योजना ईत्यादी अनेक प्रकारची कामे मागिल आठ वर्षापासुन राज्यातील हजारो संगणक परिचालक प्रामाणीकपने करत आहे.परंतु याच संगणक परिचालकाला वर्षभर मानधन मिळत नाही.राज्याचे मुख्यमंञी देवेन्द्र फडणवीस यांनी आश्वासन देऊनसुद्धा प्रत्येक महिण्याच्या एका निश्चित तारख्येला मानधन मिळाले नाही.

ग्रामिण भागातील 6 कोटी जनतेचे अनेक प्रकारचे आँनलाईन कामे तसेच या डिजीटल युगात प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये एका संगणक परिचालकाची कायम स्वरुपी शासनाकडुन नियुक्ती करणे अत्यंत आवश्यक असतांना शासन वारंवार बोगस कंपन्यांची नियुक्ती या आपले सरकार प्रकल्पासाठी करते.या कंपन्या जनतेच्या हक्काचा शासनाचा निधी हडप करुन भ्रष्टाचार करत आहेत.त्याबाबत शासनाकडे वारंवार तक्रार करुनही शासनाने त्या तक्रारीवर कोनतीही कारवाई केली नाही.संग्राम प्रकल्पात भ्रष्टाचार झालेला असतांना त्यांचेवर कारवाई करणे गरजेचे असतांना उलट परत त्याच कंपनीच्या व्यक्तींना आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पाचे काम देवुन शासनाने राज्यातील हजारो संगनक परिचालकांची फसवणुक केली आहे.त्याच प्रमाणे 'आपले सरकार सेवा केंद्र' या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करुन ग्रामिण भागातील 6 कोटी जनतेला मुलभुत सुविधा पुरविण्यासाठी असलेला 14 वा वित्त आयोगाचा निधी सी.एस.सी.एच पि.व्ही.व तिच्या उपकंपन्या हडप करत आहेत.

पंतप्रधान नरेन्द्र मोदी तसेच मुख्यमंञी देवेन्द्र फडणवीस हे नेहमी डिजीटल इंडीया बाबत बोलत असतात.परंतु डिजीटल महाराष्ट् करणार्या संगणक परिचालकांना वार्यावर सोडले आहेत.राज्याचे मुख्यमंञी व राज्याच्या ग्रामविकासमंञी पंकजा मुंडे यांनी मागील 4 वर्षात वेळोवेळी दिलेल्या आस्वासनाची पुर्तता केलेली नाही.त्यामुळे संगणक परिचालक हे पद निश्चित करुन महाराष्ट् माहिती तंञद्ण्यान महामंडळाकडुन नियुक्ती देणे या एकाच मागणीसाठी हिवाळी अधिवेशनादरम्यान मुंबई येथे आझाद मैदानावर 27 ते 28 नोव्हेंबर 2018 रोजी राज्यातील हजारो संगणक परिचालकांच्या वतिने सलग 4 दिवस राञंदिवस आंदोलन करण्यात आले होते.त्यावेळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी 30 नोव्हेंबर 2018 ला मुख्यमंञी देवेन्द्र फडणवीस यांनी राज्याच्या विधान परिषदेत व संघटनेच्या शिस्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत आश्वासन दिले होते की 10 दिवसात बैठक घेवुन महाराष्ट आय टी महामंडळाकडुन नियुक्ती देण्याचा निर्णय देण्यात येईल.परंतु आठ महिने झाले मुख्यमंञी साहेबांनी बैठक घेतलेली नाही.तसेच निर्णय ही दिलेला नाही.आता 14 व्या वित्त आयोगातुन आपले सरकार प्रकल्पास निधी देण्यास राज्यातील ग्रामपंचायतींनी विरोध केल्यामुळे संगणक परिचालकांना केलेल्या कामाचा मोबदला वर्षभर मिळत नसल्यामुळे राज्यातील संगणक परिचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.त्यामुळे विविध 8 मागण्या घेवुन राज्यातील सुमारे 27906 ग्रामपंचायती मधिल सर्व संगणक परिचालक सर्वप्रकारचे शासकीय,खाजगी स्वरुपाचे आँनलाईन व आँफलाईन कामकाज बंद करुन दि.19 आँगष्ट 2019 पासुन बेमुदत आंदोलनावर जात आहेत.याचाच एक भाग म्हणुन वणी तालुक्यातील सर्व ग्राम पंचायत मधिल संगणक परिचालकांनी दि.22 आँगष्ट्ला येथिल तहसिलदार व बिडीओ यांच्या मार्फत मुख्यमंञी देवेन्द्र फडणवीस यांना निवेदन देवुन काम बंद आंदोलनात भाग घेतला आहे.या आंदोलनामुळे शेतकरी व नागरीकांना मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यावेळी राजकुमार वडस्कर,धनराज तांदुळकर,गणेश कळसकर,महेश ताजणे,गजानन सातपुते,मारोती मामीडवार,प्रविण थेरे,प्रदिप मालेकर,विलास ढेंगळे,लक्षमन आञाम,सचिन डाहुले,सुमित खोब्रागडे,मारोती कोंगरे ईत्यादिसह शेकडो संगणक परिचालक उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share