WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या भव्य शोभयात्रेने दुमदुमली वणी नगरी.....

Image

बालगोपाल गोविंदानी फोडली मटकी :- पालखी, देखाव्यांचे विशेष आकर्षण.... वणीतील रंगनाथस्वामी देवस्थान वणी येथे श्रावनमासानिमित्य विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते तसेच 23 च्या मध्यरात्री भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला त्यात भगवान वासुदेव यांच्या भूमिकेत ज्ञानेश्वर दुधलकार यांनी उत्कृष्ट भूमिका सादर केली व सकाळी भव्य शोभा यात्रा काढण्यात येऊन बाळ गोपालाचे विशेष आकर्षण चर्चेचा विषय ठरला व यावेळी दिनांक 24 ला 12 वाजता दरम्यान दहीहंडी फोडून बालगोपालांनी त्यांचा उत्साह द्विगुणित केला.... श्री रंगनाथ स्वामी देवस्थानात विविध कार्यक्रम घेण्यात आले यात भक्तिसंध्या, संगीतमय प्रवचन, सामूहिक नाम जप सोहळा, गणपती अभिषेक, श्री संत गजानन महाराज उपासना, शिवलिंग अभिषेक आदी कार्यक्रम घेण्यात आले, तसेच भगवान श्रीकृष्णांच्या चारित्र्यावर आधारित संगीतमय प्रवचन, रात्री ह.भ.प. मनुमहाराज तुगणायत, श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा घेण्यात आला असून तर दिनांक 24 ला सकाळी 8 वाजता भगवान श्रीकृष्णाची पालखी व शोभायात्रा मंदिर परिसरात फिरवून, दहीहंडी फोडण्यात आली त्यात गोविंदा पथक यांनी तीन मजली ची चढ चढवीत तीन दा पडले मात्र दहीहंडी त्यांनी फोडली असून मोठ्या जल्लोषाच्या वातावरणात गोपाळकाला, आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात बाळ गोपाळ, भक्त गण व आदी मंदिर देवस्थानातील विश्वस्त यांनी अतिशय योग्य स्थितीत सदर कार्यक्रमात पार पाडला असून आज दुपारी 12 ते 5 महाप्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. शोभा यात्रा मंदिर परिसरात फिरवताना भजन, विविध देखावे, बँड ताशे आदींच्या गजरात विविध वाद्यांसह छोट्या मुलांना राधा कृष्णाच्या वेशभूषेत अतिशय देखणे असे देखावे दाखवण्यात येऊन श्रीकृष्ण भगवान की जय च्या गजरात संपूर्ण रंगनाथस्वामी परिसर डौलाने आनंदूत्सव साजरा करताना दिसून आला. सदर कार्यक्रमाला व महाप्रसादाला मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांनी उपस्थिती दाखवली असून त्यांनी अतिशय शांतचित्त मार्गानी सदर कार्यक्रम पार पाडले यात श्री रंगनाथ स्वामी देवस्थान वणी व श्री रंगनाथ स्वामी सेवा समिती यांनी मोलाचे सहकार्य केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share