WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

सावरकर शाळेत भाषा विषयाची ज्ञानरचनावादी कार्यशाळा

Image

सागर मुने, वणी

वणी नगर परिषद शिक्षण विभागातर्फे येथील स्वा. सावरकर नगर परिषद शाळा क्र. 5 वणी मध्ये दिनांक 24 ऑगस्टला नगर परिषद प्राथमिक शाळातील प्राथमिक शिक्षकांसाठी भाषा विषयाची एक दिवसीय ज्ञान रचनावादी अध्ययन अध्यापन शैक्षणिक कार्यशाळा घेण्यात आली.

या कार्यशाळेचे उदघाटन गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे यांनी केले. अध्यक्षस्थानी वणी नगर परिषदेच्या शिक्षण सभापती रंजुताई झाडे या होत्या. तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून मंगेश खामनकर, लक्ष्मण खोराटे, विकास चिडे हे उपस्थित होते.

उदघाटक म्हणून बोलतांना गटशिक्षणाधिकारी म्हणाले की, इंग्रजी माध्यमांच्या मोठं मोठया शाळांच्या स्पर्धेत शहरी भागात नगर परिषदेच्या शाळा टिकविण्यासाठी शिक्षकांना कार्यतत्पर राहावे लागेलं. अटलबिहारी वाजपेयीं आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळा वाभाळेवाडीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी लागेल. अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना रंजुताई म्हणाल्या की, शिक्षकांनी ज्ञानरचनावादी होऊन त्याप्रमाणे अध्ययन अध्यापन करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवावी असे आवाहन केले.

या कार्यशाळेचे प्रास्ताविक मुख्याध्यापक गजानन कासावार यांनी केले. या कार्यशाळेत श्रवण, भाषण संभाषण, वाचनपूर्व तयारी, वाचन टप्पे, जोडाक्षरे ईत्यादी बाबतीत शैक्षणिक साहित्यासह पूर्ण दिवस नगर परिषदेच्या शाळांमध्ये वर्ग पहिली ते पाचवी पर्यंत शिकणाऱ्या शिक्षकांना उत्कृष्ठ मार्गदर्शन केले. या उदघाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश तुंबडे यांनी केले.आभार प्रदर्शन प्रेमदास डंभारे यांनी केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share